पुरंदरशिक्षण

साकुर्डे शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विविध गुणदर्शनातून एक लाखांची बक्षीसे

पुरंदर, दि. ११
पुरंदर तालुक्यातील साकुर्डे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ अतिशय उत्साहात संपन्न झाला.
शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात यशवंतराव कला क्रीडा स्पर्धेतील मानकरी यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने शाळा व्यवस्थापन समितीतील सर्व सदस्यांचा व शाळेतील शिक्षकांचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान केला.
विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांचा जीवनपट, दिंडी नृत्य,संभाजी महाराजांची शौर्यगाथा,गोंधळ गीत,शेतकरी गीत,कॉमेडी नृत्य, गरबा नृत्य इत्यादी प्रकारातून उपस्थितांची मने जिंकली. वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दाद देत प्रेक्षकांनी एक लाख रुपयाची रोख रक्कम बक्षीस स्वरूपात दिली.
यावेळी साकुर्डेचे सरपंच राजेंद्र जाधव, वक्तृत्व कलेची आवड असणारे प्रा.नारायण हिराबाई भिकोबा टाक व शिवरायांचा जागर करणारे साकुर्डे गावचे सुपुत्र शिवव्याख्याते अजय जगताप, वाळुंज केंद्राच्या केंद्रप्रमुख श्रीमती सुरेखा कामथे, उपसरपंच लिलाबाई गायकवाड स्वाती पवार, सामाजिक कार्यकर्ते सुरेश तात्या सस्ते , पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष युवराज जगताप, शेतकरी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन मोहन जाधव, वामन सस्ते ,माजी सरपंच मारुती नाना सस्ते , राजेंद्र सस्ते, पोलीस पाटील प्रियांका चव्हाण ,किसन देशमुख,सोपान सस्ते गुरुजी, श्रीरंग सस्ते ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वृषाली काटे ,उपाध्यक्ष अश्विनी चव्हाण, संदीप चव्हाण, पत्रकार बी.एम.काळे ,सुनिल लोणकर, प्रकाश जगताप, मनोज सटाले , विशेष शिक्षक अश्विनी फुंदे, ग्रामस्थ , पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साकुर्डे गावच्या भैरवनाथ तरुण मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ जाधव,अमोल जाधव आणि सर्व मित्र मंडळ सदस्य सहकारी यांच्या सौजन्याने समस्त ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक सोनाली गिरमे, मीनाक्षी भगत व दिपाली वाघमारे यांनी केले कार्यक्रमाच्या नियोजनात अंगणवाडी सेविका मनीषा थोपटे यांनी सहकार्य केले. उपशिक्षिका चित्रा धनवडे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page