मुख्यमंत्र्याच्या खुर्चीत बसून महाराष्ट्राचे सुपर सीएम बनले श्रीकांत शिंदे ? सर्वत्र टीकेची झोड…

शिंदे फडणवीस सरकारची सत्ता आल्यापासून शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडताना दिसत आहेत. यामध्ये आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांची भर पडली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी श्रीकांत शिंदे यांचा एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोत श्रीकांत शिंदे हे वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसल्याचा दावा वरपे यांनी केला आहे.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी श्रीकांत शिंदे यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेला फोटो ट्विट करत शिंदे पुत्रांवर निशाणा साधला आहे. खा. श्रीकांत शिंदे यांना सुपर सीएम झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळतात. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरुय. हा कोणता राजधर्म आहे? असा कसा हा धर्मवीर? असे रविकांत वरपे यांनी ट्विटमध्ये म्हटले

तो फोटो अतिशय जबाबदार व्यक्ताने मला पाठवला आहे. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातला हा फोटो आहे. तिथे मुख्यमंत्री अधिकाऱ्यांच्या बैठका घेतात. अशा ठिकाणी त्यांचे सुपुत्र बसले आहेत. आम्ही त्यांना सुपर सीएम झाल्याच्या शुभेच्छाही दिल्या आहेत, अशा शब्दात वरपे यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं.

कदाचित राज्याचे मुख्यमंत्री गणपती मंडळ, नवरात्र उत्सव, पितृपक्ष किंवा दिल्ली वाऱ्यांमध्ये व्यग्र असल्यामुळे राज्यातील इतर लोकांचं काम पाहण्याची जबाबदारी सुपर सीएम म्हणून श्रीकांत शिंदेंकडे दिली आहे, असं आम्हाला वाटतं. राज्याचा कारभार नेमका कोण पाहतंय? हे राज्य अधांतरी आहे असंच वाटतंय. ज्याला ते वाटतंय, तो ते करतोय, असेही रविकांत वरपे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांचं हे शासकीय निवासस्थान आहे. त्याच्या मागे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असं लिहिलं आहे.
मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीच सन्मान त्यांच्या कुटुंबीयांनी आणि सगळ्यांनीच ठेवायचा असतो.
तुम्हाला इतर शासकीय भेटीगाठी किंवा अनौपचारिक भेटी घ्यायच्या असतील,
तर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीच्या बाजूला बसून तुम्ही त्या घ्या.
ती महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेच्या स्वाभिमानाची खुर्ची असल्याचे वरपे म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस नंतर शिवसेना, काँग्रेस आदी पक्ष व संघटनांकडून याबाबत मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page