आमदार संजय जगताप यांच्या लंपी पशु रोगाबाबत पशूवैद्यकीय विभागाला सूचना,
सासवड दि. ९ (प्रतीनिधी ) पुरंदर तालुक्यातील पशूधन वाचविण्यासाठी, लम्पी रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये, व लम्पी रोगाचे संक्रमण रोखण्यासाठी , प्रभावी उपाययोजनेची अमंलबजावणी करा , अशा सूचना पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी , पुरंदर तालुका पशूवैद्यकीय विभागाला दिल्या .
लम्पी ‘ स्किन या विषाणुजन्य आजाराबाबत पशूवैद्यकीय अधिकारी यांनी, सर्व विभागातील पशूवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची तात्काळ बैठक घेऊन, तसेच शेतकऱ्यांना लम्पी रोगाबाबत, माहीती त्यावरील उपाय योजना व लम्पी, रोगाची लक्षणे , त्यावरील औषधे, व लसीकरण याबाबतची माहिती देऊन जनजागृती करणे आवश्यक आहे, असे ही आमदार संजय जगताप यांनी सांगितले,
लम्पी रोगांमुळे जनावरांच्या अंगावर मोठे फोड येऊन ताप येतो. व त्यामुळे याचा परिणाम जनावरांच्या आहारावर होता, यामध्ये जनावरांचे चारा खाण्याचे प्रमाण कमी होऊन, दुधाळ जनावरांच्या दुध उत्पादनावर परिणाम होऊन दुध उत्पादन घटते, तालूक्यातील असंख्य शेतकऱ्यांचा शेतीबरोबर दुग्धव्यवसाय हा शेतीपूरक व्यवसाय आहे.
लम्पी स्किन हा आजार जनावरांत पसरत असून, तालुक्यातील पशूधन धोक्यात येऊन, शेतकरी अडचणीत येऊ शकतात याबाबत अनेक शेतकऱ्यांनी याबाबतची कैफियत व्यक्त केली आहे. त्यामुळे पुरंदर तालुका पशूवैद्यकीय अधिकारी यांनी याबाबत सतर्क राहुन योग्यत्या उपाययोजना करुन, पशूधन धोक्यात येणार नाही याबाबतची काळजी घ्यावी. अशा सूचना आमदार संजय जगताप, यांनी पशूवैद्यकीय विभागास दिल्या आहेत.