स्थानिक स्वराज्य संस्थासाठी १५दिवसांची मुदतवाढ, झेड पी च्या निवडणुका १५ फेब्रुवारी पूर्वी पूर्ण करण्याचे सुप्रीमकोर्टाचे नवीन आदेश
प्रतिनिधी
मुंबई, दि. १२ जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणूकाबाबत सुप्रीमकोर्टाने निवडणूक आयोगाला मोठा दिलासा दिला असला तरी ही केवळ १५ दिवसांचीच मुदत वाढ दिलेली आहे. येत्या १५फेब्रुवारी पर्यंत सर्व निवडणुका पार पाडण्याचे आदेशचं दिले आहेत.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाला दिले होते. आता, सुप्रीम कोर्टात महत्त्वाची घडामोड झाली आहे. राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पाडण्यासाठी सुप्रीम कोर्टाची मुदत ओलांडली जाण्याचे संकेत होते. आयोगाने सर्वोच्च न्यायालयात विशेष अर्ज दाखल केला असून, मुदत संपण्यापूर्वी ही सवलत मिळावी अशी विनंती केली होती. त्यावर आज सुनावणी झाली.
गेल्या अनेक दिवसांपासून लांबणीवर पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला मोठा दिलासा दिला आहे. निवडणुकांचे आयोजन आणि तयारी करण्यासाठी न्यायालयाने आयोगाला वाढीव १५ दिवसांची मुदत दिली आहे. आता १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत निवडणुकांचे सर्व टप्पे पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश कोर्टाने दिले आहेत. निवडणूक आयोगाने तांत्रिक आणि प्रशासकीय कारणास्तव मुदतवाढीची मागणी केली होती. ही विनंती सुप्रीम कोर्टाने मान्य केली.
सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. मात्र, सध्या अनेक ठिकाणी महापालिका निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. ज्या भागात महापालिका निवडणुका सुरू आहेत, त्याच ठिकाणी जिल्हा परिषद निवडणुकाही होऊ घातल्याने एकाच वेळी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करणे हे प्रशासनासाठी आव्हान ठरत आहे.




