वाल्हे नजीक हॉटेल बाहेर दारूच्या नशेत मित्राचा खून .जेजुरी पोलिसांनी दोघांना के
वाल्हे नजीक हॉटेल बाहेर दारूच्या नशेत मित्राचा खून .जेजुरी पोलिसांनी दोघांना केले जेरबंद
जेजुरी, दि.१५ जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील वाल्हे गाव नजिक असणाऱ्या रामा धाब्यावर दारूच्या नशेत एका तरुणाच्या डोक्यात वीट आणि बाटलीने मारहाण करून तिघा मित्रांनी गंभीर जखमी केले. गंभीर जखमी असणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला असून जेजुरी पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे.
या घटनेत पवन संभाजी शेलार वय २६ रा. काळदरी ता पुरंदर जि.पुणे, सध्या रा जेजुरी या तरुणाचा खून झाला आहे . जेजुरी पोलिसांनी तिघा विरोधात गुन्हा दाखल केला असून विकास अर्जुन भोसले, रां पिंगोरी,अविनाश आत्माराम पवार रा आडाची वाडी वाल्हे ता पुरंदर जि.पुणे यांना अटक केली असून तिसरा आरोपी तुषार शरद यादव रा पिंगोरी हा पळून गेला आहे.
या घटने बाबत जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दिनांक १४ रोजी वरील चौघे जन वाल्हे नजिक असणाऱ्या रामा या हॉटेलवर गेले होते. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास दारूच्या नशेत पैश्याच्या कारणांवरून पवन शेलार व तुषार यादव,विकास भोसले,अविनाश पवार यांच्यात भांडण झाले .यावेळी या तिघांनी पवन शेलार यांच्या डोक्यात वीट व बाटलीने मारहाण करून त्यास गंभीर जखमी केले. अशा गंभीर अवस्थेत पवन शेलार यास सोडून तिघे आरोपी पळून गेले.
पवन शेलार यास उपचारासाठी पुणे ससून रुग्णालयात दाखल केले असता उपचारा दरम्यान त्याचा आज मृत्यू झाला. जेजुरी पोलिसांनी तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून या पैकी दोघांना अटक केली आहे.असे जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी सांगितले.
या प्रकरणी आय पी एस आधिका री दर्शन दुगड,सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे तपास करीत आहेत.