महाराष्ट्रात कारखानदारी वाढण्यास पोषक वातावरण – शरद पवार
महाराष्ट्रात कारखानदारी वाढण्यास पोषक वातावरण – शरद पवार
जेजुरी, दि. ८ महाराष्ट्रात औद्योगिक वसाहती वाढण्यास, मोठमोठ्या कारखान्यांना उद्योग व्यवसाय वाढवण्यास मोठे पोषक वातावरण आहे. येथील महिला, तरुण कामगारवर्ग कारखान्याप्रती अतिशय प्रामाणिक असल्याने येथे उद्योग व्यवसाय वाढीचे प्रयत्न केले पाहिजेत असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जेजुरी येथे केले आहे.
जेजुरी इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्टर्स असोसिएशन च्या वतीने जेजुरी औद्योगिक वसाहतीत नव्याने उभारण्यात आलेल्या श्री शरदचंद्रजी पवार क्रीडा संकुल आणि हभप दादासाहेब सोनवने बॅडमिंटन कोर्ट चे उदघाटन शरद पवार यांच्या हस्ते करन्यात आले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी पुरंदर हवेलीचे आ.संजय जगताप होते. यावेळी बोलताना श्री पवार पुढे म्हणाले, ‘ राज्यातील कारखानदारी वाढण्यासाठी शहरालगतच्या जागापेक्षा ग्रामीण भागात मोठ्या संधी आहेत.मी राज्याचा प्रमुख होतो तेव्हा राज्यातील ग्रामीण भागात औद्योगिक वसाहती उभ्या करू शकलो. आज त्या ठिकाणी शेकडो कारखाने आणि हजारो कामगारांना काम मिळाल्याचे समाधान वाटते.जेजुरी सारख्या ठिकाणी वसाहत उभी राहिलेली आहे.येथे १८० कारखाने आणि सहा हजार महिला तरुनांना रोजगार उपलब्ध झाला आहे. पुरंदर दुष्काळी परिसर असला तरी ही येथील जनतेत कोणत्याही संकटांवर मात करून पुढे जाण्याची जिद्द आहे. जेजुरीतील कारखान्यातून काम करणाऱ्या युवकांनी स्वतःचे उद्योग सुरू करून हजारोंना काम दिल्याचा मला अभिमान वाटतो.भविष्यात येथे अजून ही मोठे कारखाने येणार आहेत.औद्योगिक वसाहतीचे विस्तारीकरण ही होणार आहे. पुरंदरच्या युवा पिढीला त्याचा मोठा फायदा होणार आहे.युवा पिढीने शिक्षणाबरोबरच शेतीला उद्योगाची जोड द्यावी असे आवाहन ही त्यांनी केले.
जेजुरीतील औद्योगिक क्षेत्रात काम करणारे तरुणच आज उद्योजक बनले आहेत. कामगार संघटना आणि उद्योजकांत चांगला समन्वय असून आता त्यांची पुढची पिढी ही उद्योग वाढीसाठी पुढे येऊ लागली आहे. त्यांना मार्गदर्शन आणि साथ देणे गरजेचे बनले आहे. पुरंदर तालुक्यातील सद्यस्थिती दुष्काळाची बनली आहे. आज कारखाने आणि परिसर दोघांनाही पाण्याची गरज आहे. त्याचे योग्य नियोजन केले जाईल. मात्र दुसरीकडे दुष्काळाबाबत शासनाचे अजूनही कसलेच धोरण निश्चित होत नाही. याचा त्रास सर्वांनाच सहन करावा लागत असल्याचे पुरंदरचे आ.संजय जगताप यांनी यावेळी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते सुदाम इंगळे, संजीवन आरोग्य संघटनेचे डॉ.सुनिल जगताप, इंडियाना ग्रुप चे सर्वेसर्वा प्रशांत हिंगोराणी, जिमाचे उपाध्यक्ष पांडुरंग सोनवणे, कार्याध्यक्ष रवी जोशी, राज पॉलिफॅब्रिक्स च्या ऋतुजा सोनवणे, आदींची भाषणे झाली.
या कार्यक्रमात शरद पवार यांच्या हस्ते जागतिक महिला दिनानिमित्त पिंगोरी परिसरातील १८ बिध्यार्थीनींना इंडियाना ग्रुप च्या वतीने सायकल वाटप करण्यात आले
त्याचबरोबर संजीवन आरोग्य योजनेच्या माध्यमातून दहा हजार महिलांना शरद पवार यांनी सायप्रस पूनावाला यांच्याकडून गर्भाशयाच्या कर्करोगावरील १० हजार व्यक्सिन उपलब्ध केल्या आहेत आज या लसीकरणास सुरुवात करण्यात आली
जेजुरी औद्योगिक वसाहतीत उत्कृष्ट काम करणाऱ्या इंडियाना ग्रुप चे प्रशांत हिंगोराणी, राज पोलिफॅब्रिक्सचे पांडुरंग सोनवणे, आदिनाथ फूड चे नितीन गांधी, ताज फ्रोजन चे उत्तम झगडे आदीना शरद पवार यांच्या हस्ते उद्योगभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले,
शरद पवार कार्यक्रमस्थळी आले तेव्हा त्यांचे ५० तुताऱ्या वाजवून स्वागत करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे, दिलीप बारभाई, विजय कोलते, माणिक झेंडे पाटील, प्रदीप पोमण, अभिजित जगताप, दत्ताजी चव्हाण, बबूसाहेब माहुरकर आदीसह कारखानदार, कर्मचारी कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
स्वागत व प्रास्ताविक जिमाचे अध्यक्ष डॉ. रामदास कुटे यानी केले. सूत्रसंचालन नितीन राऊत यांनी केले तर आभार युवा उद्योजिका दीप्ती जोशी, अनुजा कुटे यांनी मानले.
संयोजन जिमाचे माजी अध्यक्ष प्रकाश खाडे, सचिव राजेश पाटील, अनंत देशमुख, संभाजी जाधव, शकील शेख, जालिंदर कुंभार आदिंनी केले होते.