कु आराध्या चव्हाण ठरली साकुर्ड्याची आदर्श विद्यार्थिनी

मातोश्री जिजाई सोपानराव जाधव माध्यमिक विद्यालय साकुर्डे विद्यालयामध्ये प्रत्येक वर्षी एस.एस.सी.परीक्षा मार्च २००५-६ च्या माजी विद्यार्थ्यांच्या बॅच च्या वतीने विद्यालयामधील एका आदर्श विद्यार्थ्याला पुरस्कृत केले जाते.

चालू शैक्षणिक वर्ष सन २०२५-२६ या वर्षीचा आदर्श विद्यार्थी पुरस्कार इयत्ता ७ वी मधील कुमारी आराध्या भरत चव्हाण या विद्यार्थिनीला मिळाला आहे. कु आराध्या भरत चव्हाण या विद्यार्थिनीस भारताच्या ७७  व्या प्रजासत्ताक दिनी ध्रुव शिक्षण प्रसारक मंडळ साकुर्डे संस्थेचे अध्यक्ष मा उदय राव जाधव साहेब व साकुर्डे गावचे विद्यमान सरपंच मा राजेंद्र सस्ते यांच्या हस्ते गौरवण्यात आले.सदर पुरस्कारामध्ये एस एस सी परीक्षा २००५-६  बॅच यांच्या वतीने शाल,श्रीफळ, ट्रॉफी,प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात आले.
सदर कार्यक्रमाप्रसंगी पुरंदर पंचायत समितीचे मा.उपसभापती  निलेश जगताप,उपसरपंच सौ लीलाताई गायकवाड, माजी सरपंच माईसाहेब सस्ते,संस्थेचे सचिव  सुरेश जाधव,खजिनदार  किसन देशमुख,जेष्ठ संचालक रामदादा जाधव, संग्राम सस्ते,माजी सरपंच  राजेंद्र सस्ते, सोपानराव सस्ते ,माजी सैनिक  साहेबराव चव्हाण, वसंतराव शेरे,मुख्याध्यापक गणेश कामथे, तंटा मुक्ती अध्यक्ष दत्तासेठ जाधव, निलेश कदम सर्व ग्रामस्थ,शिक्षक शिक्षकेतर वृंद आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page