जेजुरीगडावर पुजारी सेवक वर्गाच्या वतीने महाप्रसाद प्रयोजन
जेजुरीगडावर पुजारी सेवक वर्गाच्या वतीने महाप्रसाद प्रयोजन
पाच हजार भाविकांना अन्नदान
जेजुरी दि. २३ महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री खंडोबा देवाच्या चंपाषष्ठी उत्सवाची नुकतीच सांगता झाली. या उत्सवाच्या दहा दिवसांनंतर दसमीला जेजुरीगडावर पुजारी सेवक वर्ग व ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्याची परंपरा अनेक पिढ्यान् पासून सुरू आहे. दिनांक 22 रोजी जेजुरी पुजारी सेवक वर्गाच्या वतीने जेजुरी गडावर महाप्रसाद प्रयोजन करण्यात आले. यावेळी पाच हजार भाविकांना अन्नदान करण्यात आले.
जेजुरी येथील खंडोबा देवाचे प पुजारी गुरवसेवक , ब्राम्हण समाज ,सेवकरी घडशी ,कोळी, वीर, आणि ग्रामस्थ मानकरी यांच्या वतीने प्रयोजन निमित्त खंडोबा देवाला अभिषेक महापूजा घालण्यात आली. या निमित्ताने पाचा हजार भाविकांना जेजुरी गडावर अन्नदान करण्यात आले.
पौराणिक काळात ऋषी मुनींनी मनी आणि मल्ल या दैत्यांचा संहार करण्यासाठी भगवान शंकराची आराधना केली. भगवान शंकराने खंडोबा देवाचा अवतार धारण करून सहा दिवस मनी मल्ल दैत्यांचा संहार केला . या विजयाचे प्रतीक म्हणून खंडोबा भाविक चंपाषष्ठी उत्सव साजरा करतात. व मार्गशीर्ष दसमी दिवशी जेजुरी गडावर ग्रामस्थ,पुजारी सेवकवर्ग यांच्या वतीने महाप्रसाद प्रयोजन केले जाते.