गुढीपाडव्याच्या दिवशी लोणंदमध्ये निघाली महिलांची भव्य बाईक रॅली…..
गुढीपाडव्याच्या दिवशी लोणंदमध्ये निघाली महिलांची भव्य बाईक रॅली…..
चारशे माहिलांनी घेतला सहभाग
लोणंद दि. ९ (प्रतिनिधी)
लोणंद फेस्टिव्हल, ए्व्हरेस्टवीर प्राजित परदेशी मित्र समूह व परिवर्तन ग्रुप ऑफ लोणंद तसेच लोणंद वुमन बाईक रॅली यांच्या संयुक्त विद्यमाने सलग तिसऱ्या वर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी मराठी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी महिलांच्या वूमन बाईक रॅलीचे आयोजन लोणंद नगर पंचायत पटांगणावर करण्यात आले होते.
गेल्या दोन वर्षाच्या यशस्वी बाईक रॅली नंतर यावर्षी भव्य अशी बाईक रॅली लोणंदकरांना पहावयास मिळाली. चारशे महिलांनी यामध्ये सहभाग घेतला. लोणंद मधील मुख्य चौकातून हि रॅली काढण्यात आली. सुरवातीला रामसेना वेषभुषा परिधान केलेल्या लहान मुलांचा सहभाग होता.. गावात त्यांचे ठीक ठीकानी औक्षण करण्यात आले.. फटाक्याची आतिषबाजी, तडम ताशा व रामल्लाच्या गाण्यांनी रॅली पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती
सर्व सहभागी महिलांना बॉक्स पॅक फेटा मोफत देण्यात आला. तसेच माहिलांना 2000 रुपये किमतीचे डिस्काउंट व्हाउचर कुपन त्याच बरोबर प्रत्येक सहभागी महिलेस प्रमाणपत्र आणि फ्री किचेन देण्यात आले.
सर्वोत्कृष्ठ पेहराव करणाऱ्या व पर्यावरण पुरक संदेश देणाऱ्या डॉ. माणसी आरोरा यांना वुमन बाईक रॅली २०२४ लोणंद क्वीन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
बाईक रॅलीत डान्स मस्ती, सेल्फी पॉईंट, मोफत कोल्ड ड्रिंक्स, प्रोफेशनल फोटो ग्राफर, ड्रोन कॅमरा शुटींगच्या माध्यमातून साजरा करत पारंपरिक वेषभूषा परिधान करून महिलांनी ही बाईक रॅली शांततेत व शिस्तबद्ध पध्द्ततिने पार पडली.
सुरवातीला लोणंद नगर पंचायत यांचे वतीने सर्व महिलांना माझी वसुधारा अंतर्गत पर्यावरण बचाव व निर्भय पने मतदानाचा हक्क बजावण्याची शपथ देण्यात आली. यावेळी नगर पंचायतीचे ऑफिस अधीक्षक शंकरराव शेळके, रोहित निंबाळकर व कर्मचारी उपस्थित होते.
रॅली चा शुभारंभ लोणंद नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा सीमा खरात, डॉ. शुभदा सावंत यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
प्रज्ञा खरात, रजणी शिंदे, डॉ. स्वाती शहा, दर्शना रावळ, वैशाली गवळी, व प्राजीत परदेशी मित्र सुमूहाचे यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य अरिहंत ज्वेलर्स, दही धपाटे पॉईंट, संतकृपा बेकर्स, दुर्वांकुर प्युअर व्हेज, परेश नंदकुमार गांधी, चांदवडकर ऑप्टीशिअन, राजमुद्रा लॅबोरटरीज, माने ज्वेलर्स, एच. आर. ई बाईक, कॉफी सीसीटी, सिंड्रेला ब्युटी पार्लर, अंबिका ब्युटीक, हॉटेल केतकी गार्डन, व्हेरिफाईंड इन्क्वायरीज्, सिध्दीविनायक दातांचा दवाखाना, अमोल शहा, व लोणंद फोटोग्राफर असोसिएशन यांचे सहकार्य लाभले. लोणंद पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. सूत्रसंचालन व आभार सागर राऊत, संतोष खरात यांनी मानले.