जेजुरीत पॅरा ग्लायडिंग भर वस्तीत कोसळले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला जेजुरी,
जेजुरी,दि.१२ तीर्थक्षेत्र जेजुरीत आज सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास जेजुरी गडाभोवती घिरट्या घालणारे पॅरा ग्लायडिंग जेजुरी गडा लगतच्या भर वस्तीत सतीश गुलाब गोडसे यांच्या घरावर कोसळले, यात आस्था प्रदीप माने (वय १७ वर्षे ) रा. पुणे ही गंभीर जखमी झाली आहे. यात चालक चंद्रकांत महाडिक हा ही जखमी झाला आहे. दोघांवर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याबाबत प्रत्यक्षदर्शी कडून मिळालेली माहिती अशी की, आज सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास जेजुरी गडाभोवती घिरट्या घालणारे पॅरा ग्लायडींग अचानक आकाशातून जमिनीकडे येऊ लागले. पॅरा ग्लाय डिंगला हवेत तरंगून ठेवणारी कापडी छत्री तुटलेली होती. आकाशातून वेगाने जमिनीकडे येणारे हे पॅरा ग्लायडींग कोसळणार असे दिसल्याने मोठीं पळापळ झाली. ते एका घरावर कोसळले. घरातील महिला घाबरून घराबाहेर पळाल्या. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. शेजारीच मंदिराकडे जाणाऱ्या मार्गांवर भाविकांची मोठीं गर्दी होती. याशिबाय जवळच १०० मीटर अंतरावर ऐतिहासिक चिंचबागेत राज्यभरातुन आलेले हजारो भाविक कुळधर्म कुळाचाराचे कार्यक्रम करीत होते. सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे.
याबाबत पॅरा ग्लाय डिंग चा चालक चंद्रकांत महाडिक याच्याकडून मोटारीचा एक नट निसटून पंख्यात गेला. पंखा तुटल्याने त्याने वरील छत्रीची रसी तुटल्याचे सांगितले.
गेल्या एक वर्षांपासून जेजुरीत फ्लयिंग रिन्हो पॅरा मोटरिंग सेंटर जेजुरी या संस्थेकडून पॅरा ग्लायडिंगचा व्यवसाय सुरु आहे. ग्लायडींगसाठी ५ मीनिटाच्या जेजुरीगड प्रदक्षिनेसाठी १५०० रुपये तर १० मिनिटांच्या जेजुरी गड व कडेपठार मंदिर प्रदक्षिनेसाठी २००० रुपये आकारले जातात. येथे येणारे भाविक आणि पुणे जिल्ह्यातून लोक हा थरार अनुभवाण्यासाठी येत आहेत.
भाविक ही येत आहेत.
आजची ही थरारक घटना पाहून सर्वच सुन्न झाले आहेत.
रात्री जेजुरी पोलिसांकडून याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला