जेजुर गडावर देवाला चंदन लेप, भाविकांचीही मोठीं गर्दी, वाहतूक कोंडी
जेजुरी, दि. १२ तीर्थक्षेत्र जेजुरीत आज रविवार निमित्त भाविकांची मोठीं गर्दी होती.तर जेजुरी गडावर देवाला प्रचंड उष्णतेपासून त्रास होऊ नये म्हणून चंदन लेप देण्यात आला होता. कुलधर्म कुलाचार, व धार्मिक कार्यक्रमासाठी साठी बाहेर गावाहून येणाऱ्या वाहनामुळे जेजुतील तीन ही चौक वाहतुकीमुळे जाम झाले होते. संपूर्ण दिवसभर वाहतूक कोंडी राहिली. वाहणांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
मे महिन्यातील प्रचंड उन्हाळा, आणि ढगाळलेले वातावरनामुळे निर्माण झालेला उकाडा यापासून कुलदैवत खंडोबा देवाला त्रास होऊ नये म्हणून जेजुरीतील गुरव, कोळी, वीर घडशी समाज बांधवांनी स्वयंभू लिंगाना चंदन ऊटी लेप दिला होता. देवाच्या या मानकऱ्यांनी आज पहाटेच देवाची महापूजा अभिषेक धार्मिक पूजा उरकून देवाला लेप दिला होता. यावेळी भाविक ही मोठ्या संख्येने उपस्थित होते. देवाच्या चंदन उटी लेप देण्यासाठी भाविक तुषार बहिरट यांनी सहकार्य केले होते. आज दिवसभर हजारो भविकांनी कुलदैवत खंडेरायाचे सदानंदाचा येळकोट च्या जयघोषात आणि भंडार खोबऱ्याच्या उधळनीत रांगा लावून दर्शन घेतले.
उन्हाळ्याची सुट्टी, शेतीच्या कामापासून मिळालेली विश्रांती, आणि दरवर्षी चैत्र वैशाख महिन्यात राज्यभरातील भाविक जेजुरीत येऊन कुळधर्म कुलचाराचे धार्मिक कार्यक्रम करीत असतात. या वर्षी ही दर रविवारी जेजुरीत गर्दी होतीच. मात्र पुढील रविवारी एकादशी आणि २६ मे रविवारी संकष्टी चतुर्थी असल्याने आज भाविकांनी जेजुरीत मोठीं गर्दी केली होती. सकाळपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत यात्रेचे स्वरूप आले होते. येथील ऐतिहासिक चिंच बागेला मोठ्या यात्रेचे स्वरूप आले होते.
राज्यभरातील भाविक पूर्वी बैल गाडीने जेजुरीत येऊन कुळधर्म कुलचाराचे म्हणजेच जागरण गोंधळाचे धार्मिक विधी करीत असत. आता चार चाकी वाहनांनी भाविक आपापल्या नातेवाईकांसह जेजुरीत येऊ लागले आहेत. यामुळे जेजुरीत मुख्य चौकातून वाहतूकीची मोठीं कोंडी होत आहे. यातच पालखी महामार्गाचे काम चालू असल्याने वाहतूकीस अडथळा ही येत असल्याने जेजुरी शहराच्या बाहेर वाहणांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. लोकसभा निवडणुकीमुळे जेजुरी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना बंदोबस्त लागल्याने कर्मचाऱ्यांची संख्या ही कमी राहिली. अपुऱ्या कर्मचाऱ्यांसह बंदोबस्त करताना पोलिसांची चांगलीच दमछाक होत होती.
मेल वरून फोटो पाठवले आहेत.
जेजुरी गडावर खंडोबा स्वयंभू लिंगाना चंदन उटी लेप
जेजुरीतील वाहतूक कोंडी