गॅस दरवाढ आणि तुटवड्या विरुद्ध जेजुरीत काँग्रेसचे आंदोलन
जेजुरी, दि. १६
पुरंदर तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने जेजुरी नगरपालिका चौकात गॅस दरवाढ, गॅस वितरणातील ढिसाळपणा, राज्य सरकारने शेतकरी बांधवाना दिलेली फसवी कर्ज माफी… अशा खोट्या आश्वासनांचा चुलीवर स्वयंपाक करुन निषेध करण्यात आला.
निषेध आंदोलनास माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरुंगे, प्रा सचिन दुर्गाडे, साहेबराव फडतरे, राजेंद्र बरकडे, सौ सविता बरकडे ,ॲड किरण कुमठेकर, ॲड कमलेश म्हेत्रे, बापू मोकाशी संदिप भोसले आम आदमी पार्टी चे संदिप चौंडकर, भाऊसाहेब फडतरे, सतिश जगताप, ताराबाई चोरमले आदि उपस्थित होते..
यावेळी आंदोलन कर्त्यांनी मनोगते व्यक्त करून शासनाच्या फसव्या कर्ज माफी बाबत निषेध व्यक्त केला. महायुती सरकार च्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली




