५० खोके एकदम ok दीड वर्षांपासून सुरू होते. आ.नितीन देशमुखांचा भांडाफोड. नादाला लागलात तर अनेक व्हिडीओ बाहेर काढीन असा दम…

नारायण राणे ना ही इशारा ….

शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहेत. सूरत आणि गुवाहाटीमधील अनेक व्हिडीओ आपल्याकडे असून, ते समोर आणण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. नितीन देशमुख एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेले होते. मात्र नंतर ते तेथून परत आले होते. अकोल्यात शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी शिंदे गटासोबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाही लक्ष्य केलं.

“पाच दिवसांपूर्वी माझ्याविरोधात लाचलुपत विभागाची चौकशी लावण्यात आली. पोलीस महानिरीक्षकांनी तुमचं काही असेल तर वर जाऊन भेटा असं मला सांगितलं. आपल्याविरोधात सक्तवसुली संचलनालयाची (ईडी) चौकशी लावायला हवी. ईडीची चौकशी लावली तर समाजात माझी इज्जत वाढली असती. माझ्या मुलाला चांगलं स्थळ येईल,” असा टोला नितीन देशमुख यांनी लगावला

“माझ्या विरोधात कारवाई केली, तर माझ्याकडे अनेक व्हिडीओ आहेत, ते उघड करेन. शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांचे, सत्तांतर घडवणाऱ्यांचे व्हिडीओ माझ्याकडे आहेत. पैशाने सत्तांतर झालं आहे, हे सिद्ध करेन. मी हे सिद्ध करू शकलो नाही, तर महाराष्ट्राच्या विधानसभेत आत्महत्या करेन,” असा इशाराही यावेळी त्यांनी दिला. ५० खोके एकदम ओकेचं षडयंत्र गेल्या दीड वर्षांपासून सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला.

नारायण राणेंवर टीका
“नारायण राणेंचं एक वक्तव्य मी ऐकलं, त्यामध्ये ते डुप्लिकेट सेना म्हणत होते. तुम्ही जर बारकाईने पाहिलं तर त्यांच्या डोक्यावर खोटे केस आहेत. वयाच्या ७० व्या वर्षी डुप्लिकेट केस लावावे वाटतात याची तुम्हाला जरा लाज वाटू द्या. मुंबईत फिरणं मुश्कील आहे असं आव्हान देता. तुमच्या आमदाराकडे अंगरक्षक तरी आहेत, उद्धव ठाकरेंच्या आमदारांकडे अंगरक्षक नाहीत. मी मुंबईत येतो, तुम्ही फिरणं बंद करुन दाखवा,” असं आव्हानच नितीन देशमुख यांनी दिलं आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page