स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून निळुंज ग्रामपंचायतचा अवयव दानाचा संकल्प.
जेजुरी, दि. २७ पुरंदर तालुक्यातील निळुंज ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य व ग्रामस्थ यांचा मृत्यू नंतर अवयव दान करण्याचा संकल्प केला आहे. याप्रसंगी दिनांक 24/08/2022 रोजी सदर ग्रामपंचायत च्या वतीने त्यांच्या मासिक मीटिंगमध्ये युवा सारथी फाउंडेशन च्या वतीने राबवण्यात येणारा अवयव दान जनजागृती प्रकल्प प्रसंगी हा उपक्रम व त्याचे महत्त्व समजून घेऊन सदर ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला.
यावेळी ग्रामपंचायत सरपंच सौ रूपालीताई जगताप यांनी अवयव दानाचे महत्त्व व मानवी अवयव दान का व कसे सध्याच्या धावपळीच्या युगात समाज उपयोगी आहे याचे महत्त्व सांगितले. उपसरपंच श्री उमेश भाऊ जगताप यांनीही हा सदर प्रस्ताव मांडत असताना गावातील युवकांनी तसेच ज्येष्ठ मंडळींनी मृत्यूनंतर आपणही दुःखी कष्टी रुग्णांच्या कसे कामे येऊ शकतो व मृत्यूनंतरही आपण सदैव जीवित कसे राहू शकतो याबद्दल जागृती स्वतः करून घेऊन आपल्या घरातील व्यक्तींना तसेच मित्र परिवाराला याचे महत्त्व सांगावे असे आवाहन केले.
तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री अतुल रघुनाथ जगताप यांनी या उपक्रमासाठी मोलाचे योगदान दिले असून सर्वात पहिला पुढाकार यासाठी त्यांनी घेतला
.ग्रामपंचायत सदस्य सौ रुपाली बनकर, श्री समीर बनकर ,श्री उमेश बनकर ,अश्विनी बनकर ,तसेच माजी सरपंच व सदस्य श्री गणेश होले ,तंटामुक्ती अध्यक्ष श्री सोमनाथ बोरावके ,सामाजिक कार्यकर्ते शिवाजी बनकर, श्री सुधाकर बनकर ,श्री गणेश जगताप, मनोज बनकर, शिवाजी बनकर ,बागायतदार श्री रमेश जगताप सामाजिक कार्यकर्ते संजय जगताप ,श्री शरद जगताप ,ग्रामपंचायत शिपाई श्री धनंजय लडकत, अनिल जगताप, अनिल बनकर ,विलास बनकर तसेच बचत गट महिला अध्यक्ष सौ. सुप्रिया लडकत. इत्यादी ग्रामस्थांनी अवयव दानाचे शपथपत्र भरले व अवयव दान मृत्यूनंतर करण्याचा निश्चय व्यक्त केला.
ग्रामसेवक श्री सुरेश जी जगताप यांनी सदर प्रस्तावाचे सर्व ग्रामस्थांचे व सौ रूपालीताई जगताप यांचे कौतुक व अभिनंदन केले व सरपंच रूपालीताई जगताप यांच्या कार्याची व समाजाप्रती असणारी दूरदृष्टी एक महिला म्हणून अभिमानाची आहे असे युवा सारथी फाउंडेशनचे कार्याध्यक्ष श्री अभिषेक पवार यांनी म्हटले. पुरंदर तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींनी सुद्धा याचे अनुकरण करून गरजू रुग्णांना मृत्यूपश्चात दुसरा जन्म द्यावा व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या चेहऱ्यावर हास्याचा मळा फुलवावा असे श्री अनिल खोपडे देशमुख संस्थापक अध्यक्ष युवा सारथी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांनी आवाहन व विनंती केली आहे.