स्वस्त धान्य दुकानांची निविधा पुन्हा मागवाव्यात, बेलसरकरांची मागणी

स्वस्त धान्य दुकानाच्या निविधा पुन्हा मागवाव्यात
बेलसर येथील महिला बचत गटांची मागणी
जेजुरी, दि. १३ महाराष्ट्र शासनाचे रास्त भाव शिधावाटप दुकाने परवाने मंजूर करण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई यांच्याकडील अर्जानुसार पुरंदर तालुक्यातील १८ गावांमध्ये स्वस्त धान्य दुकानांचे परवाने मिळवण्यासाठी १ जुलै रोजी अर्ज मागविण्यात आले होते. परंतु तालुक्यातील बेलसर येथील महिलांना व बचत गटांना कुठल्याही प्रकारची माहिती प्रशासनाकडून व प्रसिद्धी माध्यमांकडून मिळाली नसल्याने काही ग्रामस्थ आणि महिला दुकानाच्या परवाना बाबतीत अनभिज्ञ होत्या . निविदा पुन्हा भरण्याची संधी बचत गटांना मिळण्याबाबतची मागणी महिला करीत आहेत.

पुरंदर तालुक्यातील १८ गावांच्या स्वस्त धान्य दुकानाच्या बाबतीतल्या निवेदा १ जुलै ते ३१ जुलै दरम्यान मागविण्यात आल्या होत्या. परंतु प्रशासनाने व संबंधित विभागाने कोणतीही प्रसिद्धी या निविदाच्या बाबतीत केले नाही. त्यामुळे बेलसर मधील बचत गट अनेक महिला बचत गट यापासून वंचित राहिल्या आहेत. बेलसर मधील क्रांतीज्योती ग्रामसंघ बेलसर यांच्या एकूण ४० महिला बचत गटाच्या माध्यमातून प्रशासनाकडे त्यासोबतच जिल्हाधिकारी व तहसीलदार पुरंदर यांच्याकडे निविदा भरण्याची संधी पुन्हा एकदा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
बेलसर मधील उमेद अभियानातील जवळपास ४० गटांमधील कोणत्याच महिलेला याबद्दल माहिती मिळाली नसल्याने त्या स्वस्त धान्य दुकानाच्या निविदा भरण्यासाठी गेल्या नाहीत त्यामुळे पुरवठा शाखेकडे सदर महिला सह यांचा अर्ज सादर करणार असल्याची माहिती यावेळी सरगम महिला बचत गटाच्या अध्यक्षा सविता बुधे यांनी दिली. तसेच ४० महिला बचत गटांमधील महिलांना रेशन स्वस्त धान्य दुकान मिळणे बाबतचा अर्ज करता आला नाही त्यामुळे सदर निविदा पुन्हा प्रकाशित होऊन अर्ज भरण्याची संधी मिळावी व दोषींवर कारवाई करण्याची मागणी यावेळी महिला बचत गटांमार्फत करण्यात आली.

फेरनिविदा काढण्यासंदर्भात बेलसर मधील महिला बचत गटांच्या मार्फत पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे, तहसीलदार पुरंदर व जिल्हा अधिकारी पुरवठा शाखा यांच्याकडे सादर करणार असल्याची माहिती यावेळी महिला बचत गटाच्या सदस्यांकडून देण्यात आली. बेलसर येथील आंबेडकर भावनांमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये आसमा मुजावर, वनिता जगताप, प्रियंका चव्हाण, सविता बुधे, अश्विनी जगताप, सुजाता हिंगणे, अन्नपूर्णा जगताप यांनी आपले मत व्यक्त केले.
26 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी व तहसीलदारांना तक्रारी अर्ज करूनही दखल नाही

बेलसर मधील ग्रामस्थ विजय गरुड यांनी 26 ऑगस्ट रोजी पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पुरवठा शाखा व तहसीलदार पुरंदर यांच्याकडे मेलद्वारे तक्रारी अर्ज केला होता. परंतु त्या अर्जाची कोणतीच दखल खात्याने घेतलेली नाही. तर विजय गरुड यांच्या म्हणण्यानुसार गाव कामगार तलाठी यांच्याकडे रास्त धान्य दुकान परवाना बद्दल माहिती विचारली असता मला काही माहीत नाही मी माहिती घेऊन सांगते अशी माहिती देण्यात आली असल्याचे गरुड यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page