सासवड येथे एकावर चाकूने वार , गंभीर जखमी … हल्लेखोरावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा ..
पुरंदर, दि.२६ सासवड येथे दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याबद्दल एकाच्या पोटात चाकूने वार करण्यात आले आहेत. हल्ल्यात गणेश शशिकांत जगताप हे गंभीर जखमी झाले असून सासवड पोलिसात आरोपी अरविंद भाऊसो पवार यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. यामध्ये आरोपीही जखमी झाला असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार फिर्यादी गणेश शशिकांत जगताप जगताप हे गुरुवारी दि.२६ सायंकाळी साडे पाच वाजनेच्या सुमारास त्यांच्या शेतात जातं असताना आरोपी अरविंद भाऊसो पवार याने त्यांना दारू पिण्यासाठी पैसे मागीतले. ते दिले नाहीत म्हणून पवार यांनी जगताप यांना शिवीगाळ करायला सुरवात केली. यानंतर फिर्यादी यांनी त्याला शिवीगाळ करू नको म्हणून समजावले मात्र त्याने त्याच्या हातातील चाकू जगताप यांच्या पोटात उजव्या बाजूला खुपसला. व त्यांना जखमी केले. जगताप यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत . यामध्ये आरोपी पवार हा सुद्धा जखमी झाला असून त्याच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. तर आरोपी विरोधात भारतीय दंड विधान कलम ३०७,,५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सासवड पोलीस करीत आहेत