सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई मटका, जुगार अड्डयावर छापा टाकुन २२ जनावर कारवाई करून ३३,१४०/- रू मुद्देमाल जप्त

पुणे, दि. १४ ( प्रतिनिधी) काल दि.१३ रोजी सचिन बोडके यांची पडीक इमारतीचे मोकळया पार्किंग मध्ये रामनगर, वारजे माळवाडी, पुणे येथे बेकायदेशीरपणे पत्त्यांचा जुगार पैशावर खेळत असल्याचे पोलीस अमलदार यांना गोपनीय बातमीदाराचे मार्फतीने खात्रीशीर बातमी मिळाली.

सदर ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमलदार यांनी गोपनियरित्या पाळत ठेवून छापा टाकला असता सदर ठिकाणी बेकायदेशीरपणे मटका, सोरट, चक्री हे खेळत असल्याचे एकूण २१ इसम मिळुन आले त्यांना ताब्यात घेवून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा ३३, १४०/- रू. किचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त केला. सदर जुगार अड्डा कोण चालवत आहे याची माहिती घेतली असता सदर जुगार अड्डयाचा मालक नितीन सकपाळ हे असल्याचे माहिती मिळाली. म्हणून सदर प्रकरणी नमुद २१ ताब्यातील व ०१ पाहिजे आरोपी असे एकुण २२ इसमांविरुध्द वारजे माळवाडी पोलीस स्टेशन येथे गुरनं ३४२ / २०२२ महाराष्ट्र जुगारबंदी अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला व त्यांना पुढील कारवाई करीता वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई श्री अमिताभ गुप्ता, मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री संदिप कर्णिक मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री. रामनाथ पोकळे, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे पुणे श्री श्रीनिवास घाडगे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुंभार तसेच पोउपनि श्रीधर खडके, पोउपनि सुप्रिया पंढरकर, पोलीस अंमलदार, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, प्रमोद मोहिते, इरफान पठाण, हणमंत कांबळे, संदिप कोलगे, अमित जमदाडे, पुष्पेंद्र चव्हाण या पथकाने केली आहे.

आरोपीची नावे

१) सचिन सुधिर खराडे, वय ३२ वर्षे रा. कैनाल रोड, वारजे माळवाडी, पुणे २) मनोहर शंकर कांबळे, वय- ५० वर्षे, रा. गेट नं. ०२, मोर कंपनी शेजारी, शिवणे, पुणे

३) हणुमंत बापु तोडणकर, वय ६२ वर्षे, रा. परांजपे कॉम्प्लेक्स समोर, नन्हे, पुणे

४) विजय दामोदर बोबडे, वय ३२ वर्षे, रा. चव्हाण नगर, धनकवडी, पुणे ५) दिपक वासुदेव कृष्णाजी, वय ४० वर्षे, रा. सेंट्रल लॉज, पुणे स्टेशन, पुणे

६) देवेंद्र तेज सिंग, वय ३९ वर्षे रा. दिलीप बराटेच्या घराजवळ, दत्तनगर, वारजे पुणे ७) धिरज विभीषण माने, वय २२ वर्षे, रा. डोके किराणा दुकानाचे जवळ, रामनगर, वारजे माळवाडी, पुणे

८) बालाजी बन्सी मडके, वय ४० वर्षे, रा. पाण्याचे टाकीजवळ, रामनगर, वारजे माळवाडी,पुणे:

९) महादेव प्रकाश टाके, वय ३९ वर्षे रा. यशोदिप चौक, वारजे माळवाडी, पुणे १०) भरत नामदेव पडळदरे, वय ६० वर्षे, रा. पंढरीनाथ कॉम्प्लेक्स, शिवणे, पुणे

(1१) सुनिल महादेव केत्तम, वय ४८ वर्षे, रा. साईनगर, हिंगणे, सिंहगडरोड, पुणे

(१२) नितीन दत्तराव साबळे, वय २४ वर्षे, रा. अभिरुची परांजपे सोसायटी जवळ, पावर ग्रेट कंपनी जवळ, मानाजीनगर, न-हेगाव, पुणे

१३) एकनाथ विष्णु नानगुळे, वय- ३१ वर्षे, रा. शिवाजी चौक, पिंपरी गिरणी जवळ, रामनगर, वारजे माळवाडी, पुणे

१४) मेहबुब अजीज पठाण, वय ३२ वर्षे, रा. सुरम कॉलनी, वारजे माळवाडी, पुणे (१५) अविनाश दिलीप हुलसुरे, वय ३२ वर्षे, रा. गल्ली नं.०२, कॅनॉल रोड, कर्वेनगर, पुणे १६) दशरथ जगन्नाथ गायकवाड, वय ४७ वर्षे, रा. लक्ष्मी चौक, रामनगर, वारजे माळवाडी,पुणे (१७) मोतीलाल बबन राठोड, वय- ३३ वर्षे, रा. विठ्ठलनगर, पाण्याचे टाकीजवळ, रामनगर, वारजे माळवाडी, पुणे

१८) अमित सर्जेराव खंडाळकर, वय ३० वर्षे, रा. सुतारदरा, कोथरुड, पुणे

१९) विशाल गीप अहुजा, वय ४५ वर्षे, रा. १९६३, साई चौकाच्या पाठीमागे, पिंपरी, पुणे २०) विठ्ठल मारुती शेलार, वय ६२ वर्षे, रा. गोसावी वस्ती, रामनगर, वारजे माळवाडी, पुणे २१) आप्पा शंकर वटार, वय ४० वर्षे रा. सिध्दार्थ चौक, रामनगर, वारजे माळवाडी, पुणे पाहिजे आरोपी १) नितीन सपकाळ, रा. गणेशपुरी, वारजे माळवाडी, पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page