साकुर्डे येथे स्कॅडल मार्च, सकल मराठा एकवटला…
जेजुरी, दि. २ मराठ्यांना आरक्षण मिळावे म्हणून गेल्या आठ दिवसांपासून बेमुदत उपोषण आंदोलन करणारे मनोज जरांडे पाटील यांना पाठींबा देण्यासाठी संपूर्ण पुरंदर तालुक्यातील मोठी गावे नव्हे तर लहान लहान खेडी, बाड्यावस्त्यावर आंदोलने सुरू झाली आहेत. गावागावात नेत्यांना गाव बंदीचे बॅनर लावण्यात आले आहेत. तर साखळी उपोषण, स्कंडल मार्च काढून जरांगे पाटील यांना समर्थन देण्यात येत आहे. गावागावात मराठा आंदोलन आता तीव्र स्वरूप घेऊ लागले आहे. सोशल मीडिया च्या माध्यमातून राज्यकर्ते, लोकप्रतिनिधींना टार्गेट करण्यात येत आहे. गावागावातील मराठी तरुण आता पेटून उठला आहे अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
साकुर्डे ता.पुरंदर येथे तरुण युवक युवती आबालवृद्धांनी गावातील मुख्य रस्त्याने आळी आळीत जाऊन स्कॅडल मार्च काढून जरांगे पाटील यांना पाठींबा देण्यात आला आहे . यात सर्वपक्षीय कार्यकर्ते सरपंच सचिन थोपटे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सकल मराठा बॅनर खाली सहभागी झालेले होते.