साकुर्डे ग्रामपंचायत सरपंचपदी सचिन थोपटे बिनविरोध..
जेजुरी दि.४ पुरंदर तालुक्यातील साकुर्डे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन अरुण थोपटे यांची बिनविरोध निवड झाली.
माजी सरपंच अजित जाधव यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत सचिन थोपटे यांचा एकमेव अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषित केले
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडलाधिकारी डी एस शेळकदे यांनी काम पाहिले. यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक एस. बी. माने, तलाठी पी.टी. राठोड उपस्थित होते
साकुर्डे ग्रामपंचायत कार्यालयात ही निवडणूक पार पडली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अजित जाधव रमेश सस्ते, राजेंद्र सस्ते, ग्रामपंचायत सदस्या तृप्ती जगताप, स्वाती पवार, नीलम सस्ते, लिलाबाई गायकवाड उपस्थित होते
निवडणुकीनंतर पुरंदर तालुका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे, पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव झेंडे, पुरंदर पंचायत समितीचे माजी उपसभापती निलेश जगताप, जेष्ठ नेते सुरेश सस्ते, माजी सरपंच माई सस्ते, मारुती सस्ते, राजेंद्र सस्ते, संग्राम सस्ते, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे युवराज जगताप, वामन सस्ते, गणेश सस्ते, विजय थोपटे श्रीकांत सस्ते, संदीप लोंढे, पप्पू जाधव दिनकर थोपटे, आदींनी नवनिर्वाचित सरपंच सचिन थोपटे यांचा सत्कार केला. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन आपण साकुर्डे गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार आहोत असे यावेळी नवनिर्वाचित सरपंच सचिन थोपटे यांनी सांगितले