साकुर्डे ग्रामपंचायतीला सर्वतोपरी मदत करनार – आ.संजय जगताप
जेजुरी, दि.१० साकुर्डे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन अरुण थोपटे यांची बिनविरोध निवडणूक झाली
निवडीनंतर सरपंच सचिन थोपटे यांनी पुरंदर हवेलीचे आ संजय जगताप यांची भेट घेऊन साकुर्डे गावच्या विकासासंदर्भात चर्चा केली. यावेळी आ.जगताप यांनी नवनिर्वाचित सरपंच श्री थोपटे यांचा सत्कार केला.
यावेळी त्यांनी साकुर्डे ग्रामपंचायतीकडून विकास कामासंदर्भात प्रस्ताव द्यावेत. लोकप्रतिनिधी म्हणून मी जबाबदारीने निधी उपलब्ध करून देईन. निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असा विश्वास दिला.
आपण ग्रामस्थ आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे सरपंच सचिन थोपटे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पुरंदर काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पोमन, साकुर्डे चे माजी सरपंच राजेंद्र सस्ते, सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब काळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष युवराज जगताप, युवा उद्योजक विक्रम सस्ते, श्रीकांत सस्ते आदी उपस्थित होते.