सांस्कृतिक राजधानी म्हणून जेजुरी नगरीचा विकास होणार – आ. संजय जगताप
जेजुरी, दि. ६ महाराष्ट्राचे कुलदैवत असणारी श्री खंडोबा देवाची जेजुरी नगरी हि कलावंतांची नगरी आहे. गेली पाच वर्षे विविध विकास कामे राबवून शहराचा कायापालट झाला आहे. पुढील काळात मल्हार नाट्यगृह,पालखी तळ व कडेपठार रस्त्यावर जॉगिंग ट्रक,गार्डन,तसेच तीर्थक्षेत्र जेजुरी विकास आराखडा पूर्ण होवून सांस्कृतिक राजधानी म्हणून जेजुरी शहराचे नावलौकिक वाढेल असे पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी सांगितले.
नवरात्र उत्सवानिमित्त विसर्जन मिरवणुकीच्या वेळी पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी जेजुरी शहरातील सर्व नवरात्र उत्सव मंडळांना भेट दिली. जेजुरी विद्यानगर परिसरातील म्हाळसादेवी नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध सांस्कृतिक स्पर्धेचे पारितोषके वितरण आमदार संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा दुध संघाचे संचालक तानाजी जगताप, उद्योजक रवींद्र जोशी,नगरसेवक अजिंक्य देशमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार संजय जगताप पुढे म्हणाले की, गेली पाच वर्षात जेजुरी शहरात नागरी सुविधांची कोट्यावधी रुपयांची कामे झाली.नऊ एकर जागेत नवीन पालखी मैदान विकसित झाले.या पालखी तळाभोवती संरक्षक भिंत,ओपन जिम,जॉगिंग ट्रक,संस्कृती भवनाच्या जागेत मल्हार नाट्यगृह आदी विकास कामे विकसित होत असल्याचे त्यांनी सांगितले.
म्हाळसादेवी नवरात्र उत्सव मंडळाचे नितीन राउत,दिनेश डोईफोडे,गणेश देवकर,चांगदेव थिकोळे,महेश म्हेत्रे, कुंडलिक लाखे, संजय गायकवाड ,जोण्टी राउत, अक्षय माळवदकर,प्रदीप खेडेकर,मयूर थोरात,ओंकार जावळे, महिला मंडळाच्या प्रमुख विद्या म्हेत्रे, वृषाली खामकर,आशा देवकर, सुमती पुजारी आदी यावेळी उपस्थित होते.