जेजुरी परिसराला मुसळधार पावसाने झोडपले, पाऊण तासात १८ मिमी पावसाची नोंद..
जेजुरी,दि.२९
जेजुरी शहर व पंचक्रोशीला मुसळधार पावसाने झोडपले.
गुरुवारी (दि.२९) दुपारी साडेतीन वाजता सुरू झालेल्या अचानक आलेल्या वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह झालेल्या जोरदार
पावसाने बाजार करणाऱ्या नागरिकांची चांगलीच धांदल उडाली केवळ ४५ मिनिटांच्या कालावधीत सुमारे १८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
या वर्षीतला या परिसरातील सर्वात मोठा पाऊस आज पडला ,
झालेल्या जोरदार पावसाने बाजरी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शहरात काही ठिकाणी घरात पाणी शिरल्याचे प्रकार घडले.
आज आठवडे बाजार असल्याने बाजारात ही अचानक आलेल्या पावसाने मोठी धांदल उडाली.