संत बाळूमामांच्या मेंढ्या खंडोबा गडावर मंदिराला अश्वासह प्रदक्षणा
धन धान्याची बरकत होऊ दे ,केली प्रार्थना
जेजुरी,दि.१९ श्री सदगुरू बाळूमामा देवालय ट्रष्ट आदमापुर यांच्या वतीने निघालेल्या परिक्रमा सोहळ्यात सोमवारी(दि.१९) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास खंडेरायाच्या गडकोट आवारात अश्वासह मेंढ्यांची प्रदक्षणा पार पडली.गजढोल- ताशांचा गजर, भंडाऱ्याची उधळण आणि “येळकोट येळकोट जयमल्हार “असा गजर ,,संत बाळूमामांच्या भक्तांनी करीत नुत्यही सादर केले.
बाळूमामा देवालय ट्रष्टचे अध्यक्ष धैर्यशील भोसले यांनी पुढील वर्षी पाऊस पडू दे पीकपाणी होऊ दे धन-धान्याची बरकत येऊ दे बळीराजा सुखी होऊ दे
अशी प्रार्थना केली.
यावेळी योगेश कोंढरे ,संदीप मगदूम ,रवी सावंत ,इंद्रजित खर्डेकर ,संदीप वाल्हेकर ,नवनाथ चव्हाण ,उमेश कोंढरे ,अनिल खैरे ,प्रदीप नलावडे ,योगेश कोंढरे ,रुपेश चव्हाण,कुमार भडावळे ,आदींसह भक्तगण मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.देवसंस्थानचे विश्वस्त संदीप जगताप, पर्यवेक्षक गणेश डीखळे ,ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे ,सेवेकरी सोमनाथ उबाळे ,अतुल सावंत आदींनी भक्तगणांचे स्वागत केले.