संजय सावंत यांना राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार प्रदान…!
एकषष्टी निमित्त एकशष्ट विद्यार्थ्यांना शालेय साहित्य। वाटप
जेजुरी, दि.८ पुणे जिल्हा वृध्द कलावंत व साहित्यिक शासकीय मानधन समितीचे सदस्य व कै दिनकरराव सावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सावंत यांना आमदार संजय जगताप मित्रपरिवार आणि कडेपठार सोशल क्लब च्या वतीने राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.
जेजुरी येथील जिजामाता विद्यालय व कडेपठार सोशल क्लब यांच्या वतीने जागतिक महिला दिन तसेच संजय सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना जीवन गौरव पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर,जेजुरी उद्योजक संघाचे कार्याध्यक्ष रवींद्र जोशी यांच्या हस्ते संजय सावंत यांना जीवन गौरव पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.यावेळी सावंत प्रतिष्ठानच्या वतीने ६१ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
संजय सावंत यांनी सावंत प्रतिष्ठानच्या वतीने गेली पंचवीस वर्षे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार देवून गौरविण्यात येते. तसेच शालेय मुलांना शालेय साहित्य,दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान,विविध शाळांतील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी टाक्या बांधून देणे आदी उपक्रम राबविण्यात आले आहेत. तसेच कलावंत मानधन समितीच्या माध्यमातून सुमारे दीडशे वृध्द कलावंताना मानधन मिळवून देण्यात पुढाकार घेतला आहे. या कार्याबद्दल संजय सावंत यांना हा पुरस्कार देण्यात आला.
यावेळी जेजुरी पालिकेच्या नगराध्यक्षा वीणा सोनवणे,गटनेते सचिन सोनवणे,उद्योजक रवींद्र जोशी,माजी उपनगराध्यक्ष रमेश बयास, देवसंस्थान चे माजी विश्वस्त नितीन राऊत,प्रकाश खाडे,प्रल्हाद गिरमे,अनिकेत हरपले,विक्रम माळवदकर,प्रल्हाद गिरमे,सुरेखा सावंत,सर्जेराव सावंत,आदी उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य नंदकुमार सागर यांनी, नगराध्यक्षा वीणा सोनवणे, यांनी महिला दिना निमित्त शुभेछ्या देवून मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन वर्षा देसाई तर आभार मुख्याध्यापिका गायत्री बल्लाळ यांनी मानले.