श्री खंडोबा देवाच्या नित्यसेवेकाऱ्यांचा पनवेल येथे पुरस्कार देऊन गौरव
जेजुरी, दि २ महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशन वतीने १८ व्या गौरव सोहळ्यात ,जेजुरी येथील खंडोबा देवाचे नित्य पहाटेची भूपाळी, महापुजा, अखंड सेवा करणारे नित्य सेवेकरी. कृष्णा रूपचंद कुदळे, जालिंदर विठ्ठल खोमणे, स्वामीमय सेवा ट्रस्टचे उपाध्यक्ष- माऊली खोमणे यांना आदर्श सामाजिक सेवा पुरस्काराने गौरविण्यात आले .
महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनच्या वतीने क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहात पनवेल येथे आयोजित कार्यक्रमात डॉक्टर विश्वास मेहंदळे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर , माँ राज्यमंत्री.आदिती तटकरे , जर्नालिस्ट फौंडेशनचे अध्यक्ष डॉ राजेंद्र लोहार यांच्या उपस्थितीत आदर्श सामाजिक सेवा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
यावेळी माजी नगरसेवक चंद्रकांत गिरमे , श्री स्वामीमय सेवा ट्रस्ट जेजुरीचे अध्यक्ष भगवान डीखळे , पोपट खोमणे नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पोपट खोमणे गणेश मोरे सुयोग राऊत, योगेश तुपे, डॉक्टर प्रशांत थोरात उद्योजक विकी शेवाळे ,सचिन पायगुडे उपस्थित होते . यावेळी श्री डॉक्टर विश्वास मेहंदळे, रूपाली चाकणकर, आमदार आदितीतटकरे, पोपटद खोमणे, सौ स्नेहा कोकणे पाटील यांची भाषणे झाली .