शिवसेनेसोबत संभाजी ब्रिगेड पाठोपाठ मराठा सेवा संघाची ही ताकद.
उस्मानाबाद दि.१ शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यानंतर नव्याने मोर्चेबांधणी सुरू आहे. अशातच संभाजी ब्रिगेडने सेनेसोबत युती केली आहे आणि आता
मराठा सेवा संघाची ही सेनेला साथ मिळणार आहे.
संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना यांच्यातील युतीनंतर आता संभाजी ब्रिगेडची मातृ संस्था असणाऱ्या मराठा सेवा संघाने देखील या युतीला पाठिंबा दिला आहे. राज्यात शिवसेना व संभाजी ब्रिगेडची सत्ता आणणार असल्याचे सांगत मराठा सेवा सांगता मोठे फेरबदल करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या पुढील काळात मराठा सेवा संघाची जबाबदारी ४० वर्षाच्या आतील व शासकीय सेवेमध्ये उच्च पदस्थ असणाऱ्या मराठा अधिकाऱ्यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे.
केवळ 30 टक्केच जुने जाणते पदाधिकारी मराठा सेवा संघाच्या पदावर कार्यरत असणार आहेत. मराठा सेवा संघाचे राज्यभर एक कोटी सभासद तर ३६ वेगवेगळे कक्ष आहेत. या सर्व कक्षात फेरबदल करण्यात येणार असून मराठा सेवा संघातचा यापुढे चेहरा तरुण असणार आहे. या फेरबदलासाठी राज्यभर मराठा सेवा संघाच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. या फेरबदलाच्या माध्यमातून पुढील काळात शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीला मदत करून राजकीय सत्तेपर्यंत पोहोचण्याचा मराठा सेवा संघाचा प्रयत्न असणार आहे. आज मराठा सेवा संघाचा ३२ वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्तने मराठा सेवा संघ आपला नवीन चेहरा घेऊन येत असल्याची माहिती मराठा सेवा संघाचे संस्थपक कार्यदयक्ष अर्जुन तनपुरे यांनी दिली.