शिवसेनेच्या दसरा मेळाव्या बाबत उद्या हायकोर्टात सुनावणी…
महापालिकेकडून शिवाजी पार्क मैदानाच्या परवानगीसाठी होणाऱ्या विलंबामुळे शिवसेनेने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आता उद्या सुनावणी होणार आहे. मुळे यंदा दसऱ्याला शिवाजी पार्कच्या मैदानावर आवाज कुणाचा असणार? आणि यासंदर्भात हायकोर्ट काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
आज झालेल्या सुनावणीदरम्यान शिंदे गटातर्फे ज्येष्ठ वकील जनक द्वारकादास यांनी बाजू मांडली. तर शिवसेनातर्फे ज्येष्ठ वकील ऍस्पि चिनॉय यांनी युक्तिवाद केला. पालिकेतर्फे ज्येष्ठ वकील मिलिंद साठ्ये यांची बाजू मांडली.
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या वकिलाने आपल्या याचिकेत सुधारणा करण्यासाठी वेळ मागितल्याने मुंबई उच्च न्यायालयाने दसरा मेळाव्याच्या याचिकेवरील सुनावणी आज दुपारी अडीच वाजेपर्यंत पुढे ढकलली असल्याची प्रथम माहिती समोर आली होती.
दरम्यान, आता शिवसेनेच्या या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. दसरा मेळावा परवानगीबाबत उद्या दुपारी १२ नंतर सुनावणी होणार आहे. वकिलांच्या विनंतीवरुन आजची सुनावणी उद्यापर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
शिवसेनेच्या वकिलांच्या विनंतीवरुन आजची सुनावणी उद्यापर्यंत तहकूब करण्यात आली आहे. मुंबई पालिकेने आम्ही दाखल केलेल्या अर्जावर उत्तर दिलं आहे. आम्ही जेव्हा याचिका दाखल केली तोपर्यंत उत्तर दाखल झालं नव्हतं. कायदा आणि सुव्यवस्थाच्या कारणाखाली आमची परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे आमच्या याचिकेत सुधारणा करण्याती परवानगी देण्यात यावी. बदल करुन आम्ही नव्या मुद्यावरुन याचिकेत सुधारणा करत कोर्टापुढे येऊ शकतो. असे शिवसेनेच्या वकिवांनी युक्तिवाद केला आहे.
एकीकडे काल गोरेगावमध्ये झालेल्या शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार, अशी घोषणा दिली आहे. तर दुसरीकडे मात्र, मुंबई महापालिकेने दोन्ही गटाची शिवाजी पार्कसंदर्भातील परवानगी नाकारली आहे.
दरम्यान, दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाच्या वतीने हायकोर्टात मध्यस्थ याचिका सादर करण्यात आली आहे. स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी ही याचिका दाखल केली आहे.