शिवसेनेची ‘मविआ’मधून एक्झिट? अजित पवारांना फटकारताना उद्धव ठाकरेंचं मोठं विधान..

मुंबई, 23 जानेवारी : ‘आता सामजस्याचं राजकारण यापुढे करायचे नसेल, तर मला असं वाटतं एकत्र येण्याचे नाटक कुणी करू नये, अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना प्रत्युउत्तर दिलं.

शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज डॉ. आंबेडकर भवन इथं संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी युतीची घोषणा करण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरेंनी जागावाटपावरून अजित पवार यांना फटकारलं.

वंचित आघाडीला महाविकास आघाडीमध्ये स्थान असणार. शेवटी कुणी किती जागा लढायच्या हे अजून ठरवायचे आहे. ते ठरल्यानंतर निर्णय घेऊ. विधान परिषद निवडणुकीच्या वेळी आम्ही एकमेकांना मदत केली. त्यामुळे नागपूरला सुद्धा अर्ज भरला होता तो मागे घेतला. नाशिकची जागा काँग्रेसला जागा सोडली. त्याने जे करायचं नाही ते केलं. अमरावतीची जागा काँग्रेसने जिंकली त्यांना सोडली होती. पण आमचा माणूस नाही असं म्हटलं नाही. आता सामजस्याचं राजकारण यापुढे करायचे नसेल, तर मला असं वाटतं एकत्र येण्याचे नाटक कुणी करू नये, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना प्रत्युउत्तर दिलं

अडीच तीन वर्षांपूर्वी आम्हाला ग्रहीत धरून राजकारण केलं होतं.

शिवसेना काँग्रेससोबत जाऊ शकत नाही. राष्ट्रवादीसोबत जाऊ शकत नाही. त्यावेळी मला सांगितलं की, शरद पवार यांचं लौकीक तुम्हाला माहिती आहे, कधी पण दगा देतील, हे मी जाहीर भाषणात सांगितलं. हे मी पाहत असताना माझ्याच लोकांनी दगा दिला.

आता ऐकून जे राजकारण चाललंय, दुसऱ्याचं घर फोडून सत्तेत येणारी अवलाद गाडून टाकण्याची गरज आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. तेव्हा आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आलो, आमच्यावर अनेक आरोप झाले. पण आम्ही सगळ्या आरोपांना उत्तरं दिली. आम्ही अडीच वर्ष सरकार चालवून दाखवलो.

महाविकास आघाडीमध्ये मित्रपक्षांचे हित सांभाळायचे, जर आपण एकत्र आलो नाही तर व्यक्तिरित्या काही फायदा होणार नाही. दोन पक्ष एकत्र आले आणि कुणी महाविकास आघाडीत बिघाडी झाली असं म्हटलं तर हे देश प्रथम या हेतूला तडा जातो. आपण महाविकास आघाडीमध्ये आला आहात. घटक पक्ष म्हणून वाटचाल कराल याला कुणाचा हरकत नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

ही युती विजयी दिसणार आहे. हिंमत असेल तर निवडणुका घेऊन दाखवा. मग जागावाटप असेल कसं काय असेल, तो आमचा प्रश्न आहे. आज सुद्धा माझं गद्दारांना आणि गद्दारांच्या बापजाद्यांना आव्हान आहे की, निवडणूक घेऊन दाखवा, असं आव्हानच उद्धव ठाकरेंनी शिंदेंना दिलं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page