शिवरी येथे पंचक्रोशीच्या वतीने साखळी उपोषणाला सुरूवात…
जेजुरी, दि.२ यमाई शिवरी (ता.पुरंदर) येथे पालखी विसावा सभामंडपात मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ तक्रारवाडी ग्रामस्थांनी साखळी उपोषणात सहभाग घेत उत्स्फूर्त पाठींबा दिला.
उपोषणाला सुरुवात करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून उपोषणाला सुरूवात झाली. यावेळी शेकडो तरूण उपस्थित होते. “एक मराठा लाख मराठा”, “छत्रपती शिवाजी महाराज की जय” या जय घोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता . तर यापुढे साकुर्डे, वाळुंज, खळद यांच्या वतीने रोज एक दिवस याप्रमाणे साखळी पद्धतीने हे उपोषण सुरू राहणार आहे.
यावेळी नवनाथ कामथे,पोपट खेंगरे,विकास कामथे,नारायण कामथे, ग्रामपंचायत सदस्य पोपट काका खेंगरे,नवनाथ गायकवाड,अजित खेंगरे, सोमनाथ कामथे,संजय लिंभोरे, निखिल खेंगरे, शिवाजी खेंगरे,किरण कामठे,भाऊसाहेब कामथे, गणेश खेंगरे, प्रसाद खेंगरे,अक्षय खेगंरे, नरेंद्र खेगंरे, अनिकेत खेंगरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.