शिवरी येथील मुख्याध्यापक कुंजीर यांचे निलंबन तर केंद्रप्रमुख जगदाळे यांच्या दोन वेतनवाढी रोखल्या…..

जेजुरी,दि.२६ – शिवरी (ता.- पुरंदर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्रभारी मुख्याध्यापक बाळासाहेब बबन कुंजीर यांनी विद्यार्थ्यांना शिकवलेच नाही.आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत पुरंदरच्या गटविकास विकास अधिकारी अमिता पवार यांनी कुंजीर यांचे निलंबन केले.तर केंद्रप्रमुख अनिल जगदाळे यांनी देखील कुंजीर यांना पाठीशी घातल्याचा ठपका ठेवून जगदाळे यांच्या देखील दोन वेतनढी रोखल्याची शास्ती केली.
बाळासाहेब कुंजीर यांची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवरी येथे २०१८ मध्ये बदली झाली.तेव्हापासून कुंजीर यांनी विद्यार्थ्यांना वर्गात जाऊन एकदाही शिकवले नाही.
केंद्रप्रमुख,विस्ताराधिकारी,गटशिक्षणाधिकाऱ्यांना हाताशी धरुन पाच वर्षे विद्यार्थ्यांना न शिकवता पगार घेत आहेत.त्यामुळे येथील ग्रामस्थांनी २० जुलै २०२३ रोजी पुरंदरचे गटशिक्षणाधिकारी निलेश गवळी यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या.तसेच कुंजीर यांनी पाच वर्षे विद्यार्थ्यांना न शिकवता घेतलेल्या पगाराची वसुली व्हावी अशी देखील मागणी केली होती.
मात्र प्रशासन जाणीवपूर्वक चौकशीसाठी टाळाटाळ करत होते.तसेच कुंजीर यांना अभय देत खोटे दस्ताऐवज करण्यासाठी ज्यादा वेळ दिल्याचा देखील आरोप करत ग्रामस्थांनी व माहिती अधिकार कार्यकर्ते देवानंद लिंभोरे यांनी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण सचिव, शिक्षण आयुक्त,व पुणे जिल्हा परिषदेकडे चौकशीची मागणी केली होती.
याबाबत लोकमतने ९ सप्टेंबर २०२३ रोजी सर्व प्रथम वृत्त प्रसिद्ध केले होते.या सर्वांची दखल घेत गटशिक्षणाधिकारी निलेश गवळी यांनी पुरंदरचे शिक्षण विस्ताराधिकारी पी एस मेमाणे व अनिल गायकवाड यांना बाळासाहेब कुंजीर व अनिल जगदाळे यांच्या बाबतीत ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारी नुसार चौकशी करण्यासाठी आदेश दिले.
चौकशी अधिकारी मेमाणे व गायकवाड यांनी शिवरी प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षकांकडे चौकशी करुन आपला चौकशी अहवाल सादर केला.
प्राप्त अहवालानुसार गट विकास अधिकारी अमिता पवार यांनी बाळासाहेब कुंजीर यांना दोषी ठरवून तात्पुरते निलंबित केले.व कुंजीर यांना जिल्हा परिषद पुणे येथे हजर राहण्याचे आदेश दिले.
तर केंद्रप्रमुख अनिल जगदाळे यांना देखील दोषी ठरवून जगदाळे यांच्या दोन वेतनवाढी रोखल्याची शास्ती केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page