शिवरीतील बैलगाडा शर्यतीत संग्राम या बैलाचा विहिरीत पडून मृत्यू तर लक्ष्या व मिलखा जखमी
जेजुरी, दि. १३ पुरंदर तालुक्यातील शिवरी येथे बैलगाडा शर्यतीमध्ये बैल विहिरीत पडून शर्यतीतील बैल ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे . या मध्ये संग्राम ३१५५ हा बैल या शर्यतीमध्ये दुर्दैवाने ट्रॅक शेजारी असणाऱ्या विहिरीत पडून जागीच ठार झाला. तर लक्ष्या व मिलखा जखमी झाले. आयोजकांच्या ढिसाळ कारभारामुळे हा बैल विहिरीत पडला असल्याची चर्चा सध्या परिसरात आहे. जिल्ह्यातील बैलगाडा शर्यत प्रेमींनी हळहळ व्यक्त केली आहे. या दुखःद घटनेमुळे शिवरीतील या बैलगाडा स्पर्धेच्या आयोजनावरती प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. स्पर्धेच्या आयोजनामध्ये मोठ्या प्रमाणावरती ढिसाळ नियोजन हेच संग्रामचा बळी घेण्यास कारणीभूत ठरला आहे त्यामुळे आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी बैलगाडा प्रेमींकडून केली जात आहे. ज्या ठिकाणी स्पर्धेचे आयोजन केली जाते त्या ठिकाणाची पाहणी व नाहरकत दाखले तहसीलदार पोलीस स्टेशन पशुवैद्यकीय अधिकारी आरोग्य विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग गटविकास अधिकारी यांच्याकडून घेतले जातात. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बैलगाडा ट्रॅक ची पाहणी करून बैलगाड्यासाठी ट्रॅक योग्य व अयोग्य आहे किंवा शर्यतीसाठी १००० मीटर लांबीचे अंतर धावण्यासाठी निश्चित केले आहे अधिका-यांनी स्पर्धेच्या मैदानाला भेट देऊन त्या ठिकाणी सर्व सुरक्षा नियमांचे पालन केले गेलं आहे का नाही हे पाहणे आवश्यक असतं परंतु यांनी शिवरी येथील स्पर्धेला दिलेल्या या परवानगीवरच आक्षेप असल्याची चर्चा सध्या परिसरात आहे. ज्या विहिरीमध्ये संग्राम पडला त्या विहिरीमध्येच या स्पर्धेत अवघ्या अर्धा तासापूर्वी लक्ष्या नावाचा बैल देखील या विहिरीत पडला होता. विहिरीच्या ठिकाणी बॅरिकेट लावणं गरजेचं होतं परंतु आयोजकांनी या गोष्टीकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं व स्पर्धा चालू ठेवली. अशी चर्चा देखील सध्या परिसरामध्ये दबक्या आवाजात आहे ज्यावेळी संग्राम विहिरीमध्ये पडला आणि तो मरण पावला त्या नंतर स्पर्धा थांबवा आसा आग्रह बैलगाडा मालकान कडुन होत होता परंतु आयोजकांनी याकडे दुर्लक्ष केलं व स्पर्धा पुढे चालू ठेवली आणि सत्कार समारंभ चालू ठेवले मुक्या जनावरांना देखील माणुसकीची वागणूक मिळायला हवी हेच आयोजक विसरले असे गंभीर आरोप आता बैल गाडा मालकांना कडुन होत आहे. बैलगाडा शर्यतीच्या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी यांचे टीम असणे गरजेचे आहे परंतु या ठिकाणी पशुवैद्यकीय टीम उपलब्ध नसल्याने जखमी बैलांवर उपचार करण्यासाठी बैलगाडा मालकांना शर्तीचे प्रयत्न करावे लागले असल्याची चर्चा देखील सध्या रंगत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपाभियंता स्वाती दहिवाल व उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. आयोजक संतोष लिंभोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बैलगाडा शर्यतीच्या मैदानाचे नियोजन अत्यंत चोख बजावलेले होते. सदरची विहिरी १००० फूट लांब आहे. तर ज्यावेळी बैलगाडा विहिरीमध्ये पडला त्यावेळी त्याच्या गाडा चालकाने पाठीमागेच उडी मारली होती. व विहिरीच्या कडेला पोकलेन व जेसीपी तटबंदी केलेली होती.