शिक्षकानेच केले शिक्षिकेवर अत्याचार, गुन्हा दाखल होताच शिक्षक पसार…
संगमनेर , दि.२२ एका शिक्षकाने महिला शिक्षिकेच्या असाहय्यतेचा फायदा घेत लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. त्यातून त्या महिलेस गर्भधारणा झाल्याचे समजल्यानंतर त्याने बळजबरीने तिला गोळ्या देवून गर्भपात केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या प्रकरणी घुलेवाडीतील एका जिल्हा परिषदेच्या शिक्षकासह त्याच्या सहकार्यावर शहर पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. मात्र गुन्हा दाखल झाल्याचे समजतात नराधाम शिक्षक पसार झाला आहे.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, एका ४१ वर्षीय शिक्षिकेची संगमनेर तालुक्यातील घुलेवाडीत राहणारा शिक्षक योगेश अण्णासाहेब थोरात याची जिल्हा परिषदेच्या शिक्षकासोबत जुन्या पेंशन हक्क संघटनेच्या माध्यमातून ओळख झाली. या दरम्यान दोघेही एकमेकांशी फोनवरुन संपर्क होत होता. त्यातून दोघांमध्ये मैत्री वाढत गेली. त्याच्यातून त्यांचे प्रेमसंबंध झाले. त्यातून तिला गर्भधारणा झाली. त्यानंतर तिने त्याच्याकडे लग्न करण्याचा तगादा लावला. परंतु या शिक्षकाने लग्न करण्यास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने तिने पोलिसात गुन्हा दाखल केला. यावरून सदरचा शिक्षक व त्याचा मित्र गणेश शेंगाळ या दोघांच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.