शासन आपल्या दारी निमित्त जेजुरीचा गुरुवारचा आठवडे बाजार राहणार बंद
जेजुरी, दि.११ येत्या १३ जुलै गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी आणि जेजुरी विकास आराखडा भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी जेजुरीचा गुरुवारचा आठवडा बाजार रद्द करण्यात आला आहे. हा आठवडे बाजार शुक्रवारी दि.१४ रोजी भरवण्यात येणार आहे. त्याच बरोबर दररोज ची भाजी मंडई ही बंद ठेवण्यात आलेली आहे. जेजुरीच्या मुख्य चौकात पुणे पंढरपूर पालखी महामार्गावर बसणारे फळविक्रेत्यांना ही गुरुवारी बंद ठेवण्याच्या सूचना दिल्याचे जेजुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले यांनी सांगितले.