शासनाने आपल्या दारात येऊन राज्यातील दीड कोटी लाभार्थ्यांना लाभ दिला आहे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जेजुरी, दि. ७ महाराष्ट्र शासनाने सर्वसामान्यांचे सरकार म्हणून काम करताना शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवला आहे. उपक्रमाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. आजपर्यंत राज्यभरातील सुमारे दीड कोटी लाभार्थ्यांना लाभ मिळावा असून एकूण सात कोटी लाभार्थी लाभ घेतील. आजच्या कार्यक्रमात पुणे जिल्ह्यातील सुमारे २२ लाख ६१ हजार लाभार्त्याना लाभ मिळत आहे. असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेजुरी येथे म्हटले आहे.
जेजुरी येथील पालखी मैदानावर आज शासन आपल्या दारी या बहुचर्चित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने तीर्थक्षेत्र जेजुरी विकास आराखड्याच्या कामाचा शुभारंभ ही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आ. संजय जगताप, आ.राहुल कुल, आ. अशोक पवार, आ. दत्तामामा भरणे, पुण्याचे आयुक्त सौरव राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, माजी मंत्री हर्षबर्धन पाटील, विजय शिवतारे आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते १६ लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभ देण्यात आला.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले,’ शासन आपल्या दारी या उपक्रमाबरोबरच शासनाने गेल्या वर्षभरात पूर्वीच्या अनेक प्रलंबित योजना सुरू केल्या आहेत. ३५ सिंचन प्रकल्प प्रलंबित ठेवले होते त्यांना गती देण्यात आली आहे. जेजुरी तीर्थक्षेत्र विकासासाठी ३५९ कोटींचा निधी मंजूर करून पहिल्या टप्प्यातील १०९ कोटींच्या कामाला आज सुरुवात करण्यात आली आहे. राज्यातील देवसंस्थानांचा ही विकास केला जाणार आहे. यामुळे भाविकांना दर्शन सुलभ होईल, सोयी सुविधा उपलब्ध होऊ शकतील. केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या माध्यमातून आरोग्य सेवा कॅशलेस केली जात आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून पाच लाखापर्यंत आरोग्य सेवा मोफत उपलब्ध होत आहे. १ रुपयात पीक विमा योजना, त्याच बरोबर प्रत्येक ग्रामपंचायत सक्षम करण्याचा शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. सर्वसामान्यांचे सरकार म्हणून या सरकारला मान्यता मिळाली आहे.
भाषणाचा शेवट करताना त्यांनी उद्धव ठाकरे गटाचे नाव न घेता आमच्या बद्दल अनेकांना पोट दुखीचा त्रास होऊ लागला आहे. त्यांच्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने राज्यात ७०० ठिकाणी दवाखाने सुरू करीत आहोत. उघडा डोळे आणि नीट बघा अशी कोटी करीत, अहंकार बाजूला ठेवून आम्ही बाजूला आलो, आमचे डबल इंजिन सरकारचा विकासाचा वेग बुलेट ट्रेन च्या गतीने सुरू आहे. आता अजित पवारांची साथ मिळाल्याने हे इंजिन टीबल इंजिन सरकार बनले आहे. आता विकासाचा वेग कोणीच रोखू शकत नाही. काहीजण देवेंद्र फडनवीस यांना मस्टर मंत्री म्हणून हिनवतात, त्यांना मी सांगू इच्छितो, ते मस्टर मंत्री नाही तर मास्टर मंत्री आहेत. ते चौकार, षटकार ही मारतात, आणि विकेट ही घेतात. त्यांच्या माध्यमातुन मायबाप केंद्राच्या मदतीतून महाराष्ट्रात परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात एक नंबर चे राज्य झाले आहेच. शिवाय राज्याचा सर्वांगीण विकास ही गतीने सुरू आहे.
यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. शेतकरी, अठरापगड जाती जमातीसाठी सेवा करणयासाठी विठोबा आणि खंडोबाची आम्हाला साथ आहे. यामुळे शासन स्वतः लोकांच्या दारात जाऊन विबिध योजना देत आहे. नोकरदार, जेष्ठ नागरिक, महिला, सर्वच जनताजनार्दनाची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळाली आहे. आम्ही राजकीय अभिनिवेश बाजूला सारून काम करीत असल्याचे म्हटले आहे. यावेळी त्यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.
बोलताना त्यांनी राज्याचा विकास अधिक गतीने सुरू व्हावा म्हणून पुरंदर विमानतळ हे व्हायला हवे, यासाठी व्यसपीठावर उपस्थित असणारे आ. संजय जगताप आणि विजय शिवतारे यांनी राजकारण बाजूला ठेवून मदत करावी. लोकांच्या अडचणी दूर करून शासनाला या साठी सहकार्य करावे असे आवाहन ही त्यांनी केले.
यावेळी बोलताना अजित पवार यांनी, आपण राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाजूला जाऊन शासनात सहभागी झालो. यात आमचा काहीच स्वार्थ नाही. राज्यकर्ते म्हणून आमची काही जबादारी असतेच ना ? त्याच जबाबदारीने राज्याच्या विकासासाठी आम्ही गेलो आहोत. महाविकास आघाडीतुन बाहेर पडून युतीत सहभागी झालो. ट्रीपला इंजिन सरकार झाले आहे. राज्याच्या विकासाची गती वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात सुमारे ८० हजार कोटींची कामे सुरू आहेत. साखर कारखानदारी इन्कम टॅक्स मुळे अडचणीत येत होती. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी साखर कारखान्याच्या सुमारे १५ हजार कोटी रुपयांचा टॅक्स माफ केला आहे. याचा फायदा शेतकऱ्यानाच होणार आहे पुरंदर विमानतळाबाबत बोलताना त्यांनी कोणतेही विकास काम स्थानिकांच्या सहकार्याशिवाय होत नाही. विमानतळ बाधीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिले जाणार नाही. त्यांना योग्य मोबदला देऊनच विमानतळ होईल असेही त्यांनी सांगितले.
स्वागत जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले. तर आभार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश चव्हाण यांनी मानले.