शरद पवार रुग्णालयातून थेट शिर्डीच्या मंथन शिबिरात… पुन्हा एकदा सर्वांची मने जिंकली.
शिर्डी, 5 नोव्हेंबर : गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार रुग्णालयात उपचार घेत आहे. दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंथन शिबिरासाठी ते रुग्णालयातून थेट उपस्थित राहिले.
शरद पवारांची प्रकृती अस्वस्थ आहे. मात्र अशाही परिस्थितीत ते मेळाव्यासाठी उपस्थित राहिले. पवारांचा आवाज बसला आहे. मात्र तरीही ते बोलण्याचा प्रयत्न करीत होते.
अतिशय शिस्तबद्ध वैचारिक शक्ती देणा-या शिबीराचे आयोजन केले अशी त्यांनी भाषणाची सुरुवात केली. काय म्हणाले शरद पवार? एवढी प्रचंड उपस्थिती इथे आहे. सगळ्यांची इच्छा होती म्हणून येण्याचा निर्णय घेतला. आपला मानस पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दहा दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कार्यकर्ते मजबूत करतील. अशी अपेक्षा शरद पवारांची व्यक्त केली. येवू घातलेल्या निवडणूकात राष्ट्रवादी काँग्रेस चित्र बदलवू शकते.
आपल्याला सांप्रदायिक शक्तींना पराभूत करावे लागेल. चला आपण कामाला लागू या. शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आवाहन.
राष्ट्रवादी काँग्रेसचं मंथन शिबीर शिर्डीमध्ये पार पडलं.
तब्येत ठीक नसताना सुद्धा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे हॉस्पिटलमधून शिर्डीमध्ये या शिबिरासाठी दाखल झाले. मात्र, राष्ट्रवादीचे फायरब्रँड खासदार अमोल कोल्हे यांच्यापाठोपाठ अजित पवार सुद्धा या शिबिराला गैरहजर होते. तब्येत बरी नसताना सुद्धा शरद पवार शिबिराला आले, अजितदादा मात्र गायब शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं मंथन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराला सर्व प्रमुख नेते आणि खासदार हजर आहे.
मात्र, या कार्यक्रमाला अजित पवार आले नाही. जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे. जयंत पाटील यांचं भाषण झालं. पण, अजित पवार हे या शिबिराला गैरहजर होते. अजित पवार हे आजोळी गेले असल्यामुळे शिबिराला येऊ शकले नाही, असं सांगण्यात आलं आहे