वेदांता – फॉक्सकॉनसह आदित्य ठाकरेंचा सरकारवर आणखी एक मोठा आरोप.
मुंबई दि.२१ ( प्रतिनिधी) माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज राज्यातील शिंदे सरकारवर प्रकल्पांबाबत घणाघाती आरोप केला आहे. पत्रकार परिषदेत आरोप करताना त्यांनी वेदांता-फॉक्सकॉनमुळे राज्याचं किती नुकसान झालं याची आठवण करुन दिली. बल्कड्रग पार्कही राज्याबाहेर गेल्याने किती रोजगार गेले याची देखील आठवण करुन दिली, पण आदित्य ठाकरे यावरच थांबले नाहीत. आदित्य ठाकरे यांनी वर्सोवा ब्रांद्रा सी लिंकविषयी सर्वात मोठा आरोप राज्य सरकारवर केला आहे. राज्याच्या बाहेर प्रकल्प जाणे या विषय वेगळा,पण राज्यात जे प्रकल्प राबवले जात आहेत, त्याच्या मुलाखतींची जाहिरात ही इतर राज्यातील प्रमुख शहरांमध्ये दिली जात असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
वर्सोवा बांद्रा सी लिंकचं काम बंद पाडलं गेलं, आता या कामासाठी जे इंजीनिअर्स लागणार आहेत, त्यांच्यासाठी मुलाखतीची जाहिरात ही चेन्नईत का दिली जात आहे.
महाराष्ट्राच्या तरुण-तरुणींकडे देखील हे स्कील असताना ही जाहिरात परराज्यात का. आमच्या मुलांचं यात नुकसान होतंय, ही जाहिरात मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, नागपूर किंवा अमरावतीत दिली तर आमचे तरुण मुलाखतीला पोहोचतील.
पण या तरुण-तरुणींना यापासून का दूर ठेवलं जात आहे, जाहिराती या चेन्नईत का दिल्या जात आहेत, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे, तसेच मुख्यमंत्री महोदयांनी यावर उत्तर द्यावं अशी मागणी केली आहे.
जे स्कील मुंबई-महाराष्ट्रात उपलब्ध नसेल, तर इतर राज्यातून काय परदेशातून का लोक मागवले तरी आक्षेप नाही. पण एका ठराविक शहरातच ही जाहिरात का याचं उत्तर सरकारने द्यावं असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे