वीर धरण ओव्हरफ्लो, ३४ हजार क्यूसेक वेगाने पाणी सोडले

पुरंदर : पुणे जिल्ह्यात सर्वदूर दमदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे नीरा खोऱ्यातील सर्व धरणे ओव्हरफ्लो होत आहेत. क्षमतेपेक्षा धरणात पाणी येण्याचे प्रमाण ही वाढत आहे. परिणामी धरणातून पाणी सोडण्याचा वेग वाढवावा लागत असल्याचे प्रकल्प प्रशासनाने सांगितले.

आज दि.१६ पासून दुपारी १२ वाजल्यानंतर निरा खोऱ्यातील धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला आहे. भाटघर धरणातून ७ हजार क्युसेक्सने, निरा-देवघर ३ हजार ३१६ क्युसेक्सने, गुंजवणी धरणातून १ हजार ७८० क्युसेक्सने तर विर धरणातून तब्बल ३४ हजार ४५९ क्युसेक्सने पाणी नीरा नदीच्या पात्रात सोडले जात असल्याची माहिती नीरा पाठबंधारे विभागाने दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page