विधिमंडळ मध्यवर्ती सभागृहात आता शिवसेनाप्रमुखांचे तैलचित्र विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांची घोषणा
विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावणार असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केली आहे
मुंबई, दि. 26 : विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यास विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पुढील तीन महिन्यात हे तैलचित्र लावण्याचे काम पूर्ण करणार असल्याची घोषणा ॲड. नार्वेकर यांनी विधानसभेत केली.