विद्यार्थी संचमान्यता कालावधी नोव्हेंबर अखेरपर्यंत वाढवला..
अतिरिक्त शिक्षकांना दिलासा…
जेजुरी- ( प्रतिनिधी ) ‘या वर्षी विद्यार्थ्यांची न झालेली संच मान्यता करण्यासाठी मुदत वाढविण्यात आल्याच्या सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्या.व विद्यार्थ्यांची संचमान्यता करण्यासाठीचा कालावधी ३० नोव्हेंबर २२ पर्यंत वाढवण्यात येत असल्याचे जाहीर केले.
‘कोणत्या ना कोणत्या कारणांनी शिक्षकांच्या बदल्या वादग्रस्त ठरतात.अतिरिक्त असलेल्या शिक्षकांना जास्त पटसंख्येच्या शाळांमध्ये नियुक्त करण्याची ‘समायोजन’ प्रक्रिया दरवर्षी सप्टेंबर महिन्यात केली जाते.मात्र या वर्षी संचमान्यताच झाली नाही.त्यामुळे शिक्षकांच्या ‘समायोजन’ बदल्या झालेल्या नाहीत.
याबातमची गांभीर्याने दखल घेत सन २०२२-२०२३ च्या संचमान्यतेकरिता दि.३० सप्टेंबर २२ ऐवजी दि.३० नोव्हेंबर २२ ची विद्यार्थी पटसंख्या ग्राह्य धरण्याचा सुचना प्राथमिक शिक्षक संचालक शरद गोसावी यांनी पत्राद्वारे दिल्या.
त्यामुळे रखडलेली विद्यार्थी संचमान्यता होवून कमी जास्त प्रमाणात असणाऱ्या शिक्षकांना देखील सुरु असलेल्या बदली प्रक्रियेमध्ये सामाविष्ट केले जाणार आहे.त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांचा निर्माण झालेला प्रश्न देखील आपोआपच सुटणार आहे व बदलीमध्ये अतिरिक्त शिक्षकांना वाढीव विद्यार्थी संचमान्यतेचा लाभ होणार आहे.