विकास आराखड्याला निधी कमी पडणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जेजुरी, दि. ७ सुमारे ३५९ कोटी रुपये खर्चाच्या विकास आराखड्याला शासनाने मंजुरी दिली आहे. यातील आज १०९ कोटी रुपायांचा निधी दिला आहे, भविष्यात तीर्थक्षेत्र जेजुरीच्या विकास आराखड्याला निधी कमी पडणार नाही.
तीर्थक्षेत्र जेजुरी विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आला. मंत्री महोदय आज जेजुरीत शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी जेजुरीला आले होते. याच कार्यक्रमाबरोबर जेजुरी विकास आराखड्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी प्रथम जेजुरी गडावर जाऊन कुलदैवत खंडोबाचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी तीर्थक्षेत्र जेजुरी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामाचा शुभारंभ केला. या टप्प्यात जेजुरी गडाच्या पहिल्या पायरीपासून मंदिराच्या शिखरपर्यंतच्या विविध विकास कामे केली जाणार आहेत यात मंदिर, पायरीमार्ग,दीपमाळा, छत गळती रंग काम, आदी दुरुस्तीकामे केली जाणार आहेत.
मंदिरात मंत्री
राज्यातील अठरापगड जातीधर्मच्या कष्टकरी शेतकऱ्यांना खंडेरायचा आशीर्वाद मिळावा, त्यांच्याबरोबरच आमच्या युतीच्या शासनाला ही कुलदैवताचा आशीर्वाद कायम रहावा अशी प्रार्थना मंत्रीमहोदयांनी भंडारा उधळून केली.
यावेळी मार्तंड देव संस्थांनच्या वतीने मंत्रीमहोदयांचे स्वागत केले. मुख्य विश्वस्त पोपट खोमणे, विश्वस्त मंगेश घोणे, अड् पांडुरंग थोरवे, अड् विश्वास पानसे, डॉ. राजेंद्र खेडेकर, अनिल सौन्दडें, पुरातत्व विभागाचे सहययक संचालक डॉ. विलास वाहणे, देवसंस्थांन चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप आदी उपस्थित होते.