वंदेमातरम् संघटनेची जेजुरीत राष्ट्रीय एकात्मतेची पुस्तक दहीहंडी

पुस्तक दहीहंडीच्या माध्यमातून सुसंस्कृत पिढी घडण्यास मदत होणार आहे
आमदार संजय जगताप

जेजुरी, दि २० महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या श्री खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीत पुणे जिल्हा वंदेमातरम् संघटना व युवा फिनिक्स सोसायटीच्या वतीने राष्ट्रीय एकात्मतेची जिल्हास्तरावर पुस्तक दहीहंडी साजरी करण्यात आली .यावेळी अडीच हजार विविध पुस्तकांचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. धर्म जात,पंथ सोडून फक्त भारतीय हे ब्रीद वाक्य घेवून विविध विधायक उपक्रमातून सामाजिक परिवर्तन करण्याचे स्तुत्य काम वंदेमातरम संघटना करीत आहे .पुस्तक दहीहंडीच्या माध्यमातून सुसंस्कृत पिढी घडण्यास मदत होणार आहे असे यावेळी आमदार संजय जगताप यांनी सांगितेले.
जेजुरी येथील पालखी तळावर राष्ट्रीय एकात्मतेची जिल्हास्तरावर पुस्तक दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सिनेअभिनेते रमेश परदेशी व पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार अशोक टेकवडे, वंदेमातरम् राज्य संघटनेचे अध्यक्ष वैभव वाघ,कार्यध्यक्ष सचिन जामगे,गौरव कोलते, नगरसेवक जयदीप बारभाई,सचिन सोनवणे, महेश दरेकर, बाळासाहेब सातभाई,देवसंस्थानचे विश्वस्त पंकज निकुडेपाटील,संदीप जगताप, तसेच भाजपाचे शहर अध्यक्ष सचिन पेशवे, शिवसेनचे शहर अध्यक्ष विठ्ठल सोनवणे,आदी उपस्थित होते.
सिनेअभिनेते रमेश परदेशी यांनी वंदेमातरम संघटना विविध उपक्रमाच्या माध्यमातून नवीन आदर्श पिढी घडविण्याचे काम करीत आहे. समाजात आदर्श निर्माण केला आहे असे सांगितले.
वंदे मातरम संघटनेच्या माध्यमातून वाचन संस्कृती वाढण्यासाठी पुस्तक दहीहंडी,देवदाशी महिलांसाठी रक्षाबंधन व भाऊबीज,राष्ट्रीय सणा निमित सांस्कृतिक महोत्सव,तसेच कोरोना काळात राज्यभरात फूड पोकेट ,किराणा कीट,पाणी मास्क वाटप करण्यात आले असल्याचे पुणे जिल्हा वंदेमातरम् संघटनेचे अध्यक्ष जहीर मुलांनी यांनी सांगितले.
पुणे जिल्हा वंदेमातरम् संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जहीर मुलाणी यांचा यावेळी आमदार संजय जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे नियोजन जिल्हाध्यक्ष जहिर मुलाणी,पदाधिकारी विक्रम माळवदकर ,अड महेश माने,अड गणेश लेंडे,अड स्वाती बारभाई,चंदकांत झगडे,प्रदीप खेडेकर,श्रीकांत पवार, श्याम दरेकर ,नितीन पुरोहित,कुणाल यादव,अमिती वाल्मिकी अनिकेत हरपळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन राउत यांनी केले.
फोटो पाठवला केला आहे.
जेजुरी येथे वंदे मातरम संघटनेच्या पुस्तकांची दहीहंडीचे उद्घाटन करताना मान्यवर .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page