राष्ट्रवादी युवक काँग्रेस व राष्ट्रवादी महिला काँग्रेस कडून घरगुती गौरी सजावट स्पर्धा.
जेजुरी, दि.३ बारामती लोकसभा मतदार संघाच्या खा. सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस, महिला राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वतीने जिल्हा परिषद व नगरपालिका गट निहाय गौरी सजावट स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती बारामती लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अजिंक्य टेकवडे यांनी दिली.
१ सप्टेंबर ते ५ सप्टेंबर या कालावधीत घेतल्या जाणाऱ्या या स्पर्धांत भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी आपल्या गणेश गौरी सजावटीचे ३० सेकंदाचे चित्रीकरण, तीन फोटो, जाहिरातीतील QR कोड द्वारे scan करून दिलेल्या लिंक वर पाठवायचे आहेत. विशेष म्हणजे देखावा सामाजिक, काल्पनिक, पारंपारिक व पर्यावरण पूरक असणे गरजेचे आहे. आवश्यकतेनुसार परीक्षक ही संपर्क साधून भेट देणार आहेत. स्पर्धेचा निकाल व बक्षीस वितरण एकाच दिवशी होणार आहे.
विजेत्यांना १०,००० रुपये प्रथम, ७,००० रुपये द्वीतीय आणि ५,००० त्रितीय क्रमांकाची जिल्हा परिषद व नगरपालिका गट निहाय ठेवण्यात आली आहेत. एकूण १८ बक्षिसे दिली जाणार असल्याचे ही त्यांनी सांगितले. संपर्कासाठी ७४४७४६८१४५/४६/४७/४८/४९/५० या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन ही अजिंक्य टेकवडे यांनी केले आहे.