राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांची सोडत जाहीर…पुणे जिल्हा परिषद सर्वसाधारण खुले आरक्षण.
मुंबई, दि.३० राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे.
यात पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गासाठी राहिले आहे.
ग्रामविकास विभागाने ३० सप्टेंबर रोजी याबाबतचा शासकीय निर्णय जाहीर केला आहे. यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी), तर पुणे झेडपीचे अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित आहे. ग्रामविकास विभागाच्या या निर्णयामुळे झेडपीच्या निवडणुका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोग त्या कधी घेणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
एकीकडे राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका राज्य सरकारने लांबवणीवर टाकल्या आहेत. तसेच, महानगरपालिका आणि नगरपालिकांसदर्भातही राज्य सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला आहे. मात्र, ग्रामविकास विभागाने ३० सप्टेंबर रोजी राज्यातील ३० झेडपी अध्यक्षांचे आरक्षण जाहीर केले आहे. त्यामुळे निकटच्या काळात निवडणुका लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
राज्यातील जिल्हा परिषदांचे जिल्हानिहाय आरक्षण पुढील प्रमाणे
ठाणे : सर्वसाधारण
पालघर : अनुसूचित जमाती
रायगड : सर्वसाधारण
रत्नागिरी : नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
सिंधुदुर्ग : सर्वसाधारण
नाशिक : सर्वसाधारण (महिला)
धुळे : सर्वसाधारण (महिला)
जळगाव : सर्वसाधारण
नगर : अनुसूचित जमाती
नंदुरबार : अनुसूचित जमाती (महिला)
पुणे : सर्वसाधारण
सोलापूर : नागरिकांचा मागास प्रवर्ग
सातारा : नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
सांगली : सर्वसाधारण (महिला)
कोल्हापूर : सर्वसाधारण (महिला)
औरंगाबाद : सर्वसाधारण
बीड : अनुसूचित जाती
नांदेड : नागरिकांचा मागास प्रवर्ग
उस्मानाबाद : सर्वसाधारण (महिला)
परभणी : अनुसूचित जाती
जालना : नागरिकांचा मागास प्रवर्ग
लातूर : सर्वसाधारण( महिला)
हिंगोली : सर्वसाधारण (महिला)
अमरावती : सर्वसाधारण (महिला)
अकोला : सर्वसाधारण (महिला)
यवतमाळ : सर्वसाधारण
बुलढणा : सर्वासाधारण
वाशिम : सर्वसाधारण
नागपूर अनुसूचित जमाती
वर्धा : अनुसूचित जाती (महिला)
चंद्रपूर :अनुसूचित जाती (महिला)
भंडारा : अनुसूचित जमाती (महिला)
गोंदिया : नागरिकांचा मागास प्रवर्ग
गडचिरोली : नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)