राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा…

नवी दिल्ली, दि. २३ महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना १०० कोटींच्या कथित वसुलीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.

उच्च न्यायालयाने दिलेला जामीन सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार देत कोर्टाने सीबीआयने दाखल केलेले जामीनाविरोधातील अपील फेटाळून लावले आहे.

नोव्हेंबर 2022 मध्ये मुंबईच्या विशेष न्यायालयाने अनिल देशमुखांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर कनिष्ठ न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देत देशमुखांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. येथे देशमुखांना जामीन मिळाला होता.

मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णया विरोधात सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार देत ही मागणी फेटाळून लावली आहे.

१०० कोटींच्या वसुलीचा आरोप असलेल्या देशमुख यांनी ईडीने अटक केली होती. जवळपास ११ महिने अनिल देशमुख यांनी तुरुंगात काढले. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने देशमुखांना १ लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला. नोव्हेंबर २०२१ पासून देशमुख तुरुंगात होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page