राज्यपालांना महाराष्ट्रातून हलवेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार…

– सासवडला निषेध सभेत बाळासाहेब भिंताडे यांचे मत., महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी केला जाहीर निषेध –

सासवड , दि.२९ ( प्रतिनिधी ) बेताल वक्तव्य करणारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना महाराष्ट्र राज्यातून हलवित नाहीत, तोपर्यंत राज्यातील महाविकास आघाडीचे घटक पक्ष तीव्र आंदोलन करत राहतील. आम्ही हे आंदोलन लावून धरले आहे., असा इशारा सासवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब भित्ताडे यांनी दिला.

सासवड नगरपालिकेसमोर शिवतीर्थ चौकात राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे गैर उदगार काढले., त्याबद्दल राज्यपालांचा निषेध करण्यासाठी महा विकास आघाडीतील घटक पक्षांनी निषेध आंदोलन केले. त्यावेळेस श्री. भिंताडे बोलत होते. यावेळी योगगुरु रामदेव बाबा यांनी महिलांबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर उद्गार काढले. त्याबद्दलही त्यांचाही निषेध करण्यात आला. शिवाय कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल जे अपशब्द वापरले. त्याचाही निषेध यावेळेस करण्यात आला. यावेळी सासवडचे माजी नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, माजी नगरसेवक अजित जगताप, संदीप जगताप, सुहास लांडगे, यशवंतकाका जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर महिला अध्यक्ष नीता सुभागडे, बंडूकाका जगताप, गौरी कुंजीर, प्रियंका सुतार, राजाभाऊ क्षीरसागर, आप्पा सकट, सागर जगताप, राजेंद्र जगताप, विकास नाळे, मनोहर जगताप आदी अनेक जण व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अरुणाप्पा जगताप, सागर जगताप, अभिजीत जगताप, बाळासाहेब भिंताडे, सुहास लांडगे आदींनीही राज्यपाल व सत्तार तसेच रामदेव बाबा आदींचा निषेध करणारी मनोगते व्यक्त केली. शेवटी निषेधाच्या घोषणा देत महाविकास आघाडीचे घटक पक्ष कार्यकर्त्यांसह सासवड पोलीस ठाण्यात गेले. तिथे आपले निवेदन देऊन तिघांचाही निषेध करीत असल्याची नोंद घेण्याचे विनंती केली.

” राज्यात खोके सरकार आल्यापासून महापुरुषांबद्दल, स्रीयांबद्दल, शेतकर्यांबद्दल बेताल व्यक्तव्य वाढले. जनतेच्या कामापासून लक्ष दुसरीकडे पांगवण्यासाठी हा खटाटोप आहे. पण हे सरकार लवकरच कोसळेल. “
– अभिजित म. जगताप, तालुका प्रमुख (ठाकरे) शिवसेना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page