मोदींच्या नेतृत्वाखाली कृषिप्रधान भारत देशाचा सर्वांगीण विकास- माजी आमदार अशोक टेकवडे
प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र कार्यक्रम
जेजुरी, दि. २८ प्रधान मंत्री किसान योजनेच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील साडे आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे १७,५०० कोटी रुपयांचे अनुदान हस्तांतरित केले . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व ,कामाची दिशा,जनतेवरील विश्वास,हा देशाला प्रगती पथावर नेहणारा आहे. कृषिप्रधान भारत देशाला आर्थिकदृष्ट्या बळकट करण्याचे मोठे योगदान असून देशाचा सर्वांगीण विकास साधला गेला आहे असे प्रतिपादन पुरंदर हवेलीचे माजी आमदार व भाजपचे नेते अशोक टेकवडे यांनी केले.
जेजुरी येथे प्रधानमंत्री कृषी समृद्धी केंद्र कार्यक्रमाचे आयोजन महेश कृषी केंद्र येथे करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार अशोक टेकवडे बोलत होते. राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर चे व्यवस्थापक संदीप केसरकर यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात एकाच वेळी सव्वा लक्ष प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राचे लोकार्पण केले आहे. या केंद्रातून खते औषधे व बियाणांच्या विक्री बरोबरच शेतकऱ्यांसाठी बीजप्रक्रिया,माती तपासणी,हवामानातील बदल आणि घ्यायची पिके आदींची एकाच छत्राखाली माहिती मिळनार आहे असे सांगितले.
यावेळी जेजुरी शहर भाजपचे अध्यक्ष सचिन पेशवे यांनी देशाच्या ग्रामीण भागातील सर्व सामान्य,तळागाळातील शेतकरी बांधवांपर्यंत पीएम किसान योजना पोहचवून देश बलाढ्य करण्यासाठी जनतेने आग्रही असायला हवे असे आवाहन केले. यावेळी जेजुरी पालिकेच्या माजी नगरध्यक्षा लता दोडके,भाजपचे हरीश्चंद भापकर,राष्ट्रीय केमिकल अंड फर्टिलायझरचे मुख्यव्यवस्थापक विलास पाटील,महेश कृषी केंद्राचे नितीन पवार व मोठ्या संख्यने शेतकरी वर्ग उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय माने तर आभार युगावर्त पवार यांनी मानले.