मुख्यमंत्री शिंदे अडचणीत येणार? मविआकडून अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली….
मुंबई, दि.२७
अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्याची तयारी महाविकास आघाडीकडून सुरु करण्यात आली आहे. यासाठी ठाकरे गट पुढाकार घेणार आहे. विधानपरिषदेत मविआचं संख्याबळ अधिक आहे, त्यामुळं शिंदेंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न होणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना त्यांचा संबंध देशद्रोह्यांशी असल्याचा उल्लेख केला होता. विरोधीपक्ष नेते अजित पवार आणि राष्ट्रवादीचे सध्या तुरुंगात असलेले नेते नवाब मलिक यांचा संबंध जोडत शिंदेंही ही जहरी टीका केली होती
शिवसेना फुटल्यानंतर विधानसभेत ठाकरे गटाचं संख्याबळ कमी झालंय. त्यामुळं महाविकास आघाडीकडं विधानसभेत संख्याबळ नाही पण विधानपरिषदेत आहे, त्यामुळं मुख्यमंत्र्यांविरोधात अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. पण हा ठराव दोन्ही सभागृहांमध्ये कोण मांडतंय हे पहावं लागणार आहे.