मी बाबा आमटे यांच्या स्वप्नांचा ठेकेदार – डॉ. विकास आमटे

तुकाराम भाऊ जाधव यांच्याकडून संस्थेला सात लाखांची देणगी

पुणे दि.२५ ( प्रतिनिधी )
जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी महारोग्यांचे पुनर्वसन करताना त्यांच्यामध्ये आत्मविश्वास व स्वाभिमान निर्माण करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवन मध्ये विविध योजना राबवून आनंदवनास एका उंचीवर नेऊन ठेवले आहे. त्यामध्ये माझ्या आई साधना ताई आमटे यांचा फार मोठा वाटा आहे .आनंदवन येथे कुष्ठरोग्यांची सेवा करताना आजही विविध अडचणींचा सामना करावा लागतो आहे. असे उद्गार महारोगी समितीचे सचिव डॉ विकास आमटे यांनी काढले.
श्री तुकाराम भाऊ जाधव आणि परिवाराच्यावतीने डॉक्टर विकास आमटे यांचा अमृत महोत्सवी कृतज्ञता समारंभ पुणे विद्यार्थी गृहाच्या मुक्तांगण इंजिनिअरिंग कॉलेज ,शिवदर्शन ,पर्वती येथे संपन्न झाला.त्या निमित्ताने श्री तुकाराम भाऊ जाधव यांनी सात लाख रुपयांचा धनादेश देणगी स्वरूपात महारोगी सेवा समिती आनंदवन चे सचिव डॉक्टर विकास आमटे यांच्याकडे सुपूर्द केला श्री तुकाराम भाऊ जाधव यांनी सुरुवातीस ६ वर्षे सैन्य दलात काम केले नंतर ग्राम विस्तार अधिकारी म्हणून गोवा,शिरूर तालुका अशा विविध ठिकाणी काम करून सेवानिवृत्त झाले .समाजकार्याचा ध्यास घेऊन नोकरी दरम्यान कष्टाने मिळवलेल्या पैशातून त्यांनी १९९२ साली त्यांच्या साकुर्डे तालुका पुरंदर या मूळ गावी ध्रुव शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेची स्थापना करून मातोश्री जिजाई सोपानराव जाधव माध्यमिक विद्यालय सुरू केले .त्यासाठी १९९२ मध्ये त्यांनी विद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी दहा लाख रुपये देणगी दिली . गावातील मुलींची गैरसोय पाहून मुलींनी शिकून मोठे व्हावे या उद्देशाने तुकाराम जाधव यांनी साकुर्डे येथे माळरानावर शिक्षण संस्थेच्या रूपाने नंदनवन उभे केले .आज या विद्यालयात १९५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.आज त्यांनी विद्यालयाच्या भौतिक विकासासाठी पन्नास हजार रुपये देणगी स्वरूपात दिले .डॉक्टर विकास आमटे यांनी वयाची ९० वर्षे पूर्ण केलेल्या श्री तुकाराम भाऊ जाधव यांच्या समाजसेवेच्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पुणे विभागीय कार्यवाह श्री रावसाहेब पवार, पी.बी शितोळे (पाणी पंचायत,पुरंदर,पुणे), ध्रुव शिक्षण प्रसारक मंडळ साकुर्डे संस्थेचे अध्यक्ष उदयराव जाधव तसेच डॉक्टर विकास आमटे यांच्या सून सौ पल्लवी आमटे , समीर जाधवराव,साहेबराव लगड,राजेंद्र पायगुडे,राजीव नाईक ,संजय शितोळे ,कैलास जगताप तसेच श्री तुकाराम भाऊ जाधव यांच्याबरोबर नोकरी दरम्यान असलेले सहकारी व मित्र मंडळी मोठ्या संख्येने हजर होते.
कार्यक्रमाचे आयोजन श्री प्रमोद जाधव व प्रल्हाद जाधव यांनी केले .प्रास्ताविक प्राध्यापक दीपक जांभळे (माजी जिल्हा समादेशक होमगार्ड पुणे) , सूत्रसंचालन पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडीचे कार्याध्यक्ष श्री तानाजी झेंडे यांनी केले तर आभार संस्थेचे संचालक श्री मारुती आबुराव सस्ते यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page