मावडी दरोड्यातील तिघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक
जेजुरी, दि.३ जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील मावडी क प येथे दि २८ रोजी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास तीन चोरट्यांनी घरफोडी करून व कोयत्याने मारहाण करून पळून गेलेल्या तिघांना स्थानक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे.
सचिन चंद्रकांत भोसले वय २८ ,नितीन किशोर काळे, वय २५ दोघे रा.खरातवाडी, श्रीगोंदा,तसेच कृष्ण शेतकरी काळे वय ४५ रा. टाकळी तांदळी ता.श्रीगोंदा या तिघा चोरट्यांना स्थानक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे.
या बाबत स्थानिक गुन्हे शाखेने दिलेली माहिती अशी की, जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील मावडी कडेपठार येथे दि २८ रोजी तिघा चोरट्यांनी बबन रामभाऊ भामे यांच्या घराची कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. यावेळी आवाज झाल्याने बबन भामे यांनी चोरट्यांना विरोध केला. यावेळी एका चोरट्याने त्यांची डोक्यात कोयत्याने वार केला. तर दुसऱ्या चोरट्यांनी त्यांच्या कपातील दोन हजार रुपये व कागदपत्रे घेवून सदर आरोपी पळून गेले.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल. अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे,पोलीस उपाधीक्षक धनंजय पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली खाली या चोरट्यांना पकडण्यासाठी तातडीने पथक नेमण्यात आले. या पथकातील पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे,गणेश जगदाळे,पोलीस हवालदार जनार्दन शेळके,विजय कांचन,अमोल शेंडगे,धीरज जाधव, दगडू वीरकर यांनी श्रीगोंदा तालुक्यातील खरात वाडी येथे सापळा रचून तिघा आरोपींना २४ तासात जेरबंद केले. या तिघा आरोपींवर वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल आहेत.