मार्तंड देव संस्थान विश्वस्त निवडी वाद…..जुनी जेजुरीकरांचा आज आंदोलनात सहभाग
आंदोलन तीव्र करण्याचा जेजुरी करांचा निर्धार
जेजुरी, दि. २८ तीर्थक्षेत्र जेजुरीच्या खंडोबा मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या मार्तंड देव संस्थानच्या विश्वस्तांच्या पंच वार्षिक नियुक्त्या नुकत्याच झाल्या आहेत. पुणे धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून होणाऱ्या या निवडीत राजकीय हस्तक्षेप झाला आहे. स्थानिक विश्वस्तांच्या निवडी नाहीत या पार्श्वभूमीवर जेजुरीकरांत मोठा असंतोष असून ग्रामस्थांनी निवडी रद्द होईपर्यंत देव संस्थान चे कार्यालय भक्तनिवासा समोर साखळी उपोषण सुरू केले आहे. आज जुनी जेजुरीतील ग्रामस्थांनी उपोषणात सहभाग घेतला. सकाळपासून भक्त निवासासमोर ग्रामस्थांनी भजन कीर्तन गात धर्मादाय आयुक्तांचा व नवनियुक्त विश्वस्तंचा निषेध केला. अनोदोलनाला पुरंदर हवेलीचे आ.संजय जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष माणिक झेंडे पाटील, मनसे चे तालुकाध्यक्ष उमेश जगताप, कात्रज दूध संघाचे संचालक तानाजी जगताप, यांनी सहभाग घेऊन आंदोलनाला पाठींबा दिला. ग्रामस्थांच्या मागण्या रास्त असून शासकीय पातळीवरून याबाबत योग्य ती कार्यवाही व्हायला हवी. अशी मागणी ही त्यांनी यावेळी केली. नव्याने झालेल्या विश्वस्त निवडी रद्द होईपर्यंत हे आंदोलन आणखीन तीव्र स्वरूपाचे करण्याचा निर्धार ही जेजुरीकरांनी व्यक्त केला.
आंदोलनाला जेष्ठ नागरिक संघटना, बारा बलुतेदार संघटना, प्रहार अपंग संघाटनेच्या अध्यक्षा सुरेखा ढवळे, वंदे मातरम संघटना, कडेपठार वारकरी संघटना, भाऊ माझा प्रतिष्ठान, टायगर ग्रुप जेजुरी आदी संघटनांनी प्रत्यक्ष सहभाग घेत पाठींबा व्यक्त केला आहे.
आजच्या साखळी उपोषणात माजी नगरसेवक सदाशिव बारसुडे, राजेंद्र कुंभार, अजिंक्य जगताप, दिगंबर उबाळे, संपत कोळेकर, मार्तंड देव संस्थान चे माजी विश्वस्त संदीप जगताप, खांदेकरी मानकरी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे, समता प्रतिष्ठान चे रोहिदास कुदळे, प्रशांत लाखे संतोष खोमणे आदिंनी सहभाग घेतला होता.
विश्वस्त निवडीत स्थानिकांवर अन्याय झाला आहेच. शिवाय राजकीय हस्तक्षेप ही झालेला आहे. यामुळे ग्रामस्थांनी सुरू केलेले आंदोलनाला आपला सर्वतोपरी पाठींबा असून भविष्यातील प्रत्येक आंदोलनात आपला सहभाग असेल. कायदेशीर मार्गांने या निवडी विरुद्ध ग्रामस्थांनी लढा सुरू केला आहे त्याला ही आपण सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन आ.संजय जगताप यांनी यावेळी दिले आहे.